Watch Video: Bollywood's most hot actress was Udita Goswami; Now busy! | Watch Video : बॉलिवूडची सर्वात हॉट अभिनेत्री होती उदिता गोस्वामी; आता संसारात आहे व्यस्त!

बॉलिवूडमध्ये जेव्हा-केव्हा हॉट आणि सेक्सी अभिनेत्रींची चर्चा होते तेव्हा उदिता गोस्वामी हिचे नाव समोर आल्याशिवाय राहत नाही. उदिताने भलेही बॉलिवूडमध्ये कमी चित्रपट केले असतील, परंतु जेव्हा ती पडद्यावर आली तेव्हा रोमान्सची लेव्हल खूपच हाय राहिली आहे; मात्र गेल्या काही वर्षांपासून ती बॉलिवूडमधून गायब झाल्याने उदिताची खबरबात जाणून घेण्यास तिचे चाहते आतुर आहेत. 

उदिता पहिल्यांदा चर्चेत तेव्हा आली जेव्हा २००३ मध्ये तिचा ‘पाप’ हा चित्रपट रिलीज झाला. चित्रपटात तिच्यासोबत जॉन अब्राहम दिसत होता. या चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर फारशी कमाल केली नाही परंतु या चित्रपटातून उदिता बोल्ड इमेज तयार करण्यात यशस्वी झाली. ‘पाप’मध्ये उदिता आणि जॉनमध्ये जबरदस्त बोल्ड आणि इंटिमेट सीन्स बघावयास मिळाले. त्यावेळी हा चित्रपट सर्वात हॉट अ‍ॅण्ड बोल्ड म्हणून घोषित करण्यात आला. खरं तर चित्रपटातील बोल्डनेसचा अंदाज पोस्टर बघूनच आला होता. या चित्रपटानंतर उदिताला अनेक चित्रपटांच्या आॅफर्स आल्या. पुढे ती २००५ मध्ये आलेल्या ‘जहर’मध्ये झळकली. त्यामध्येही तिने जबरदस्त बोल्ड सीन्स दिले. या चित्रपटात तिच्या अपोझिट सीरियल किसर इमरान हाशमी बघावयास मिळाला. या चित्रपटाच्या पोस्टरमध्येही उदिताने बेअर बॅकची पोज दिली होती. त्यावेळी याचा विरोधही करण्यात आला होता. परंतु प्रेक्षकांना उदिताला बघायचे असल्याने हा विरोध फारसा प्रभावी ठरला नाही. दरम्यान ‘जहर’च्या शूटिंगदरम्यान उदिताला मोहित सुरी याच्यावर प्रेम जडले. काही दिवसानंतर दोघांनी लग्नही केले. ‘जहर’नंतर उदिता पुन्हा एकदा इमरान हाशमीबरोबर ‘अक्सर’ या चित्रपटात रोमान्स करताना दिसली. तिच्या गेल्या चित्रपटाप्रमाणे तिने याही चित्रपटात जबरदस्त इंटिमेट सीन्स दिले. इमरान आणि उदिताची केमिस्ट्री त्यावेळी प्रेक्षकांची प्रचंड भावली होती. इथपर्यंतच्या प्रवासात उदितानेही बॉलिवूडमध्ये स्वत:ची छाप पाडली होती. तिच्या चाहत्यांमध्ये झपाट्याने वाढ होती होती, परंतु अचानकच ती या चित्रपटानंतर बॉलिवूडमधून गायब झाली. पुढे थेट २०१२ मध्ये तिने ‘डायरी आॅफ ए बटरफ्लाय’ या चित्रपटातून कमबॅक केले; मात्र हा चित्रपट बॉक्स आॅफिसवर अतिशय वाइट पद्धतीने अयशस्वी झाला. दरम्यान, उदिता सध्या चित्रपटांपासून दूर असून, संसारात गुंतली आहे. उदिता मोहित सुरीची पत्नी असून, तिला एक मुलगी आहे. 
Web Title: Watch Video: Bollywood's most hot actress was Udita Goswami; Now busy!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.