पाहा, ‘ठग्स आॅफ हिन्दोस्तान’चा मेकिंग व्हिडिओ!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2018 09:18 PM2018-10-09T21:18:16+5:302018-10-09T21:18:45+5:30

 होय,  दिवाळीच्या मुहुर्तावर म्हणजे येत्या ८ नोव्हेंबरला प्रदर्शित होणा-या या चित्रपटात मेकिंग व्हिडिओ रिलीज करण्यात आला आहे.

Watch The making of Thugs of Hindostan | पाहा, ‘ठग्स आॅफ हिन्दोस्तान’चा मेकिंग व्हिडिओ!

पाहा, ‘ठग्स आॅफ हिन्दोस्तान’चा मेकिंग व्हिडिओ!

googlenewsNext

आमिर खान आणि अमिताभ बच्चन यांचा बहुचर्चित चित्रपट ‘ठग्स आॅफ हिन्दोस्तान’ या चित्रपटाकडे प्रेक्षक डोळे लावून बसले आहेत. साहजिकचं या चित्रपटाबद्दलची एकही बातमी प्रेक्षक चुकवू इच्छित नाही. अशात ‘ठग्स आॅफ हिन्दोस्तान’चा मेकिंग व्हिडिओ चुकवण्याचा तर प्रश्नचं नाही. होय,  दिवाळीच्या मुहुर्तावर म्हणजे येत्या ८ नोव्हेंबरला प्रदर्शित होणा-या या चित्रपटात मेकिंग व्हिडिओ रिलीज करण्यात आला आहे.

ट्रेड अ‍ॅनलिस्ट तरण आदर्श यांनी आपल्या ट्विट हँडलवर ‘ठग्स आॅफ हिन्दोस्तान’चा मेकिंग व्हिडिओ पोस्ट केला आहे. खरे सांगायचे तर हा चित्रपटाचा व्हिडिओ नसून चित्रपटातील दोन जहाजांचा मेकिंग व्हिडिओ आहे. या दोन जहाजांना बनविण्यासाठी किती परिश्रम घ्यावे लागले हे या व्हिडिओत दाखवण्यात आले आहे. पण हा व्हिडिओ पाहणेही एक वेगळा अनुभव आहे.

‘ठग्स आॅफ हिन्दोस्तान’ या चित्रपटामध्ये आमिर खान आणि अमिताभ बच्चन हे दोघेही एकत्र स्क्रिन शेअर करणार असल्यामुळे चाहत्यांमध्ये या चित्रपटाबद्दल प्रचंड उत्सुकता आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला. चित्रपटाचा ट्रेलर आपल्याला थेट १७९५ सालात घेऊन जातो. ईस्ट इंडिया कंपनी आली होती व्यापार करायला पण आता भारतावर राज करू लागली आहे. मात्र काही लोकांना गुलामी मान्य नव्हती, इथून ट्रेलरला सुरुवात होते. ट्रेलरच्या सुरूवातीलाच ‘आझाद’च्या रूपात अमिताभ बच्चन यांचा जबरदस्त अ‍ॅक्शन अवतार दिसतो. तो पाहून अंगावर शहारे येतात. या आझादला पकडणार इंग्रजांना आझादसारखाचं बहादूर ठग हवा असतो. हा ठग म्हणजे आमिर खान. आमिर खानची एन्ट्री जबरदस्त आहे. त्याचा विनोदी अंदाज मनाला भावतो. पुढे आमिर आणि अमिताभची जुगलबंदीही ट्रेलरमध्ये दिसते.

Web Title: Watch The making of Thugs of Hindostan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.