Washing the poster of 'this superstar' with the couple, washing, video viral! | ‘या’ सुपरस्टारच्या पोस्टरला जोड्याने मारणाºया तरुणाची चाहत्यांनी केली धुलाई, व्हिडीओ व्हायरल!

असे म्हटले जाते की, साउथ इंडियन चित्रपटांमधील स्टार्सची फॅन फॉलोइंग कमालीची असते. कारण या फॅन्सच्या मनात त्यांच्या स्टार्सबद्दल एवढा आदर असतो की, ते त्याला देवासमान समजतात. त्यामुळेच साउथमधील बरेचसे असे स्टार्स आहेत, ज्यांचे मंदिरे बांधण्यात आली आहेत. तेलगू अभिनेता पवन कल्याण हे त्यातीलच एक नाव असून, त्याच्याप्रती चाहते प्रचंड संवेदनशील आहेत. याचा प्रत्यय नुकताच एका व्हिडीओच्या माध्यमातून बघावयास मिळाला. सध्या पवन कल्याणचा एक व्हिडीओ इंटरनेटवर तुफान व्हायरल होत असून, त्यामध्ये एक तरुण पवन कल्याणच्या पोस्टर्सला जोड्याने मारताना अन् पोस्टर्सवर थुंकताना दिसत आहे. व्हिडीओ थोडा पुढे गेल्यानंतर हाच तरुण अंडरवियरवर जमिनीवर बसलेला दिसत असून, हात जोडून माफी मागताना दिसत आहे. या तरुणाच्या अवतीभोवती पवन कल्याणचे बरेचसे चाहते दिसत असून, त्याची लाथाबुक्यांनी धुलाई करताना दिसत आहे. 

हा व्हिडीओ वॅरिफाइड ट्विटर हॅण्डल तेलगू ३६० वरून शेअर करण्यात आला असून, त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, पवनच्या चाहत्यांचा व्हिडीओ. ज्यामध्ये चाहते एका तरुणाची जबरदस्त धुलाई करीत आहेत. वास्तविक ज्या तरुणाला मारहाण करण्यात आली, तो निर्दोष नाही. कारण त्याने अगोदर पवनच्या पोस्टरला जोड्याने मारले. याच चुकीमुळे चाहत्यांनी त्याची धुलाई केली. 
 }}}} ">Video of pawanfans beating an youngster so badly !
The victim isn't innocent either - he did first mistake by hitting poster w/ chappals see both in video

Though these fans' fights are trivial , uploading them to web , terrorizing all others about same assault is dangerous pic.twitter.com/aLGssY4LgO

— Telugu360 (@Telugu360) January 18, 2018
पवनच्या चाहत्यांनी हा व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल केला आहे. जेणेकरून अधिकाधिक लोकांपर्यंत हा संदेश पोहोचू शकेल की, जो कोणी पवनबद्दल असे करेल त्याला अशाच प्रकारची शिक्षा दिली जाईल. दरम्यान, हा व्हिडीओ अपलोड झाल्यानंतर यूजर्समध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. बºयाच यूजर्सनी म्हटले की, त्या तरुणाने केलेले कृत्य चुकीचे होते. परंतु त्याला अशाप्रकारची शिक्षा देणेही चुकीचे आहे. 
Web Title: Washing the poster of 'this superstar' with the couple, washing, video viral!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.