'आशिकी'च्या पोस्टरवरील कलाकारांचे चेहरे झाकण्यामागे हे होते कारण, वाचून व्हाल थक्क

By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2019 09:00 PM2019-06-01T21:00:00+5:302019-06-01T21:00:00+5:30

१९९० साली 'आशिकी' चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटात अभिनेत्री अनु अग्रवाल व अभिनेता राहुल रॉय झळकले होते.

This was the reason behind covering the faces of artists on 'Aashiqui' poster, because they are going to read | 'आशिकी'च्या पोस्टरवरील कलाकारांचे चेहरे झाकण्यामागे हे होते कारण, वाचून व्हाल थक्क

'आशिकी'च्या पोस्टरवरील कलाकारांचे चेहरे झाकण्यामागे हे होते कारण, वाचून व्हाल थक्क

googlenewsNext


१९९० साली 'आशिकी' चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटात अभिनेत्री अनु अग्रवाल व अभिनेता राहुल रॉय झळकले होते. या चित्रपटामुळे ते प्रसिद्धीझोतात आले. महेश भट्ट दिग्दर्शित 'आशिकी' या चित्रपटाने फक्त त्या काळातच नाही तर आजच्या प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये मात्र दोघांचाही चेहरा जॅकेटने झाकलेला होता. हे चेहरे झाकण्यामागचे कारण ऐकून तुम्ही अवाक व्हाल. 

लोकसत्ताच्या रिपोर्टनुसार, 'आशिकी'ची निर्मिती टी-सीरिजच्या गुलशन कुमार यांनी केली. गुलशन कुमार यांना यातील गाणी म्युझिक अल्बमद्वारे लाँच करायची होती. पण महेश भट्ट यांनी चित्रपट आणि गाणी हिट होणार असे आश्वासन दिले तेव्हा ते निर्मिती करण्यास मान्य झाले. पण त्यानंतर त्यांनी राहुल रॉय आणि अनु अग्रवाल यांच्यावर आक्षेप घेतला. 
चित्रपटातील हिरो आणि हिरोईन काही खास दिसत नाही. त्यामुळे हा चित्रपट हिट होईल का यावर मला शंका आहे, असे गुलशन कुमार महेश भट्ट यांना म्हणाले. त्यावर महेश भट यांनी तोडगा काढला आणि त्यांनी पोस्टरवर चेहरा न दाखवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर गुलशन कुमार आशिकी चित्रपट रिलीज करायला तयार झाले. इतकेच नाही तर चित्रपटाची फक्त निर्मिती करणार नाही तर मोठ्या प्रमाणात मार्केटिंग करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. 
आशिकीच्या या पोस्टरवर चेहारा झाकलेला असूनही या पोस्टरची सगळीकडे खूप चर्चा झाली होती.

Web Title: This was the reason behind covering the faces of artists on 'Aashiqui' poster, because they are going to read

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.