हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफच्या वॉर या चित्रपटाचा टीझर तुम्ही पाहिला का?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2019 06:16 PM2019-07-15T18:16:41+5:302019-07-15T18:22:54+5:30

हृतिक आणि टायगर आता वॉर या चित्रपटात एकत्र झळकणार असून या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे.

War Teaser Has Hrithik Roshan and Tiger Shroff Going at Each Other’s Throats | हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफच्या वॉर या चित्रपटाचा टीझर तुम्ही पाहिला का?

हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफच्या वॉर या चित्रपटाचा टीझर तुम्ही पाहिला का?

googlenewsNext
ठळक मुद्देवॉर या चित्रपटाच्या टीझरमध्ये आपल्याला खूप सारी अ‍ॅक्शन आणि थ्रिल अनुभवायला मिळत आहे. या चित्रपटात वाणी कपूर देखील महत्त्वाच्या भूमिकेत असून या टीझरमध्ये आपल्याला तिचा हॉट अंदाज पाहायला मिळत आहे. 

हृतिक रोशनने कहो ना प्यार है या चित्रपटाद्वारे त्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली. हा त्याचा पहिलाच चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला. त्याने या चित्रपटानंतर कधीच मागे वळून पाहिले नाही. त्याच्या अभिनयासोबतच त्याच्या डान्सिंगची देखील नेहमीच चर्चा होते. तसेच त्याच्या अ‍ॅक्शनचे देखील अनेक चाहते आहेत. बॉलिवूडमधील सगळ्या अभिनेत्यांमध्ये हृतिक हा सगळ्यात चांगला डान्सर असल्याचे म्हटले जाते. त्याचसोबत टायगर श्रॉफच्या देखील नृत्याची तारीफ केली जाते. बागी या चित्रपटामुळे नावारूपाला आलेला टायगर अगदी हृतिकसारखाच नाचतो, अ‍ॅक्शन करतो असे म्हटले जाते. हृतिक आणि टायगर या दोघांच्याही अभिनयाचे आणि डान्सिंगचे अनेक चाहते आहेत. त्यामुळे त्या दोघांना एकत्र चित्रपटात पाहाण्याची अनेकांची इच्छा आहे. 

हृतिक आणि टायगर आता एका चित्रपटात एकत्र झळकणार असून या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. वॉर असे त्यांच्या चित्रपटाचे नाव असून या चित्रपटाच्या टीझरमध्ये आपल्याला खूप सारी अ‍ॅक्शन आणि थ्रिल अनुभवायला मिळत आहे. या चित्रपटात वाणी कपूर देखील महत्त्वाच्या भूमिकेत असून या टीझरमध्ये आपल्याला तिचा हॉट अंदाज पाहायला मिळत आहे. 

हृतिक आणि टायगरचा वॉर हा चित्रपट हिंदी प्रमाणेच तामीळ आणि तेलुगू भाषेतही प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या टीझरसोबतच या चित्रपटाचा फर्स्ट लूक पोस्टरही लाँच करण्यात आला आहे. हा टीझर आणि फर्स्ट लूक प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे.

हृतिक, टायगर आणि वाणीची मुख्य भूमिका असलेला वॉर हा चित्रपट २ ऑक्टोबर २०१९ ला प्रदर्शित होणार असून या चित्रपटाच्या चित्रीकरणाविषयी अतिशय गुप्तता बाळगण्यात आली होती. या चित्रपटाची निर्मिती यश राज प्रोडक्शनची असून या चित्रपटाबाबत कोणतीही माहिती बाहेर जाऊ नये असे आदित्य चोप्राने त्याच्या टीमला सांगितले होते. त्यामुळेच या चित्रपटाबाबत कोणतीच गोष्ट समोर आलेली नव्हती. हा चित्रपट सिद्धार्थ आनंदने दिग्दर्शित केला असून या चित्रपटाची प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे. 

Web Title: War Teaser Has Hrithik Roshan and Tiger Shroff Going at Each Other’s Throats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.