​वाणीने सांगितले, ‘आदित्य चोप्रा को गुस्सा क्यों आता है?’

By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2016 02:48 PM2016-12-04T14:48:02+5:302016-12-04T15:23:52+5:30

आदित्या चोप्रा दिग्दर्शित ‘बेफिक्रे’ हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होतोय.  रणवीर सिंह आणि वाणी कपूर यांची ‘बेफिक्रे’मधील हॉट केमिस्ट्री आणि ...

Wani said, 'Why does Aditya Chopra get angry?' | ​वाणीने सांगितले, ‘आदित्य चोप्रा को गुस्सा क्यों आता है?’

​वाणीने सांगितले, ‘आदित्य चोप्रा को गुस्सा क्यों आता है?’

googlenewsNext
ित्या चोप्रा दिग्दर्शित ‘बेफिक्रे’ हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होतोय.  रणवीर सिंह आणि वाणी कपूर यांची ‘बेफिक्रे’मधील हॉट केमिस्ट्री आणि किंसींग सीन्स यामुळे हा चित्रपट आधीच चर्चेत आला आहे. त्यातच चित्रपटाची लीड अ‍ॅक्ट्रेस हिने एक जबरदस्त खुलासा केला आहे. होय, आदित्य चोप्रा को गुस्सा क्यों आता है? या प्रश्नाचे उत्तर वाणीने दिलेयं.
आदित्य चोप्रा म्हणजे मितभाषी दिग्दर्शक़ पडद्यामागे काम करणाºया आदित्यला मीडियासमोर येणे आवडत नाही. त्यामुळे तो कधीच मीडियासमोर येत नाही वा मीडियाशी बोलताना दिसत नाही. आता यावरून आदित्य प्रचंड रागीट आहे आणि कधीच हसत नसावा, असेच तुम्हाला वाटत असेल. एका मर्यादेपर्यंत ते बरोबरही आहे. आदित्यसोबत वाणीने काम केलेय. त्यामुळे साहजिक आदित्यसोबतचा सेटवरचा तिचा अनुभव कसा राहिला? असा प्रश्न वाणीला विचारण्यात आला. आदित्यला कशाचा राग येतो, असेही तिला विचारण्यात आले. वाणीने अगदी प्रामाणिकपणे या प्रश्नांची उत्तरे दिलीत.



ती म्हणाली, आदित्यला राग येतो. पण सेटवर नाही. त्याला एका वेगळ्याच कारणाने राग येतो. रेस्टॉरंटमध्ये गेल्यावर आदित्य स्वत: आॅर्डर करतो. यावेळी अन्य कुणी आॅर्डर केले की, त्याला संताप येतो. त्याचा पारा चढतो. आदित्यला आपल्या क्रू मेंबर्ससोबत खाणे-पिणे अतिशय आवडते. आपल्या क्रू मेंबर्सला ते नवनव्या डिशेज खाऊ घालतात. पण यावेळी मेन्यू कार्ड त्यांच्याच हातात असतो. ते जे आॅर्डर करतील, तेच फायनल. तसाही आदित्य जगभर फिरला आहे. त्याला जगभरातल्या वेगवेगळ्या डिशेजबद्दल पूर्ण माहिती आहे. त्यामुळे तो नव नव्या डिशेज मित्रांना, त्याच्या क्रू मेंबर्सला खाऊ घालतो. स्वत:ही वेगवेगळ्या डिशेज ट्राय करतो. ‘बेफिके्र’च्या शूटींगवेळी पॅरिसमध्येही त्याने अशाच अनेक डिशेज ट्राय केल्या..

Web Title: Wani said, 'Why does Aditya Chopra get angry?'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.