Vivek Oberoi's brother gave permission to work with Aishwarya Rai! | विवेक ओबेरॉयच्या भावाने ऐश्वर्या रायसोबत काम करण्यास दिला स्पष्ट शब्दात नकार!

‘ऐ दिल है मुश्किल’ या चित्रपटातून दमदार कमबॅक करणारी अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन लवकरच ‘फॅनी खान’ या चित्रपटात झळकणार आहे. मात्र या चित्रपटाविषयी सध्या एक खळबळजनक बातमी समोर येत आहे. होय, वृत्तानुसार, चित्रपटात ऐश यंग अ‍ॅक्टरबरोबर रोमान्स करताना दिसणार आहे. याकरिता दिग्दर्शक राकेश ओमप्रकाश मेहरा यांची टीम ऐशचा एक्स बॉयफ्रेंड विवेक ओबेरॉय याचा चुलत भाऊ अक्षय ओबेरॉय याला अ‍ॅप्रोच झाली होती. परंतु अक्षयने या भूमिकेसाठी जो काही प्रतिसाद दिला तो खळबळजनक ठरत आहे. 

मीडिया रिपोर्ट्सने केलेल्या दाव्यानुसार, अक्षय ओबेरॉयने ऐश्वर्या राय-बच्चनबरोबर काम करण्यास स्पष्ट शब्दात नकार दिला आहे. अक्षयने ऐश्वर्यासोबत काम करणार नसल्याचे सांगत निर्मात्यांना माघारी पाठविले आहे. अक्षयच्या या रिप्लायनंतर एकच खळबळ उडाली असून, ऐशसोबत एखाद्या अभिनेत्याने ते सुद्धा यंग अभिनेत्याने नकार देणे हे बहुधा पहिल्यांदाच घडले आहे. वास्तविक ऐश्वर्याचे इंडस्ट्रीमधील प्रवास पाहता तिच्यासोबत काम करण्याची संधी मिळणे भाग्यच म्हणावे लागते. अशात एका यंग अभिनेत्याने नकार देणे हे खळबळजनक समजले जात आहे. वास्तविक चित्रपटाच्या निर्मात्या प्रेरणा अरोरा यांनी या सर्व चर्चा अफवा असल्याचे सांगत या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. त्यांनी म्हटले की, आगामी ‘फॅनी खान’ या चित्रपटात अद्यापपर्यंत ऐश्वर्याच्या अपोझिट कोणालाही कास्ट केलेले नाही. त्यामुळे अशाप्रकारच्या बातम्या या निव्वळ अफवा आहेत. सलमान खानसोबत ब्रेकअप झाल्यानंतर ऐश्वर्या आणि विवेक ओबेरॉय यांच्यात जवळीकता निर्माण झाली होती. मात्र विवेकसोबतही ऐश्वर्याचे प्रेमप्रकरण फार काळ टिकले नाही. कदाचित याच प्रकरणांमुळे अक्षय ओबेरॉयने ऐशसोबत काम करण्यास नकार दिला असावा. 
Web Title: Vivek Oberoi's brother gave permission to work with Aishwarya Rai!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.