vivek oberoi wants to ask this question to salman khan |   विवेक ओबेरॉयला सलमान खानकडून हवी माफी!  
  विवेक ओबेरॉयला सलमान खानकडून हवी माफी!  

ठळक मुद्देसलमान खान आणि विवेक ओबेरॉय यांच्या भांडणाचे कारण ऐश्वर्या राय होती.

एकेकाळी विवेक ओबेरॉयचे फिल्मी करिअर संपल्यात जमा होते. हे वर्ष होते, २००३. याचवर्षी विवेकने एक पत्रकार परिषद बोलवून सलमान खानवर खळबळजनक आरोप केले होते. सलमानने मद्यधुंद अवस्थेत मला ४१ वेळा फोन केला आणि माझे करिअर संपवण्याची धमकी दिली, असे विवेकने म्हटले होते. या पत्रपरिषदेनंतर खरोखरच विवेकच्या करिअरची नौका बुडू लागली. इंडस्ट्रीच्या अनेकांनी त्याच्यासोबत नाते तोडले. विवेकने या घटनेनंतर सलमानची माफीही मागितली. पण सलमानने त्यावर कुठलेही उत्तर दिले नाही.  या घटनेला उणेपुरी १६ वर्षे पूर्ण झाली आहेत. पण अद्यापही सलमानने विवेकला माफ केलेले नाही आणि सलमानने आपल्याला माफ केलेले नाही, हे विवेक अद्यापही विसरू शकलेला नाही. ताज्या मुलाखतीत तरी हेच दिसले.

सलमानला तुला काही विचारायचे झाल्यास, तू काय विचारशील? असा प्रश्न विवेकला एका मुलाखतीत केला गेला. यावर विवेकने जे उत्तर दिले, ते ऐकून सलमानलाही धक्का बसेल. होय, तू माफ करण्यावर विश्वास ठेवतोस का? हा एकच प्रश्न मी सलमानला विचारेल, असे विवेक या उत्तरादाखल म्हणाला. विवेकचे हे उत्तर त्याच्या पश्चातापाचे बोल आहेत की आणखी काही, हे त्यालाच ठाऊक. पण विवेकला खरोखर आपल्या कृत्याचा पश्चाताप झाला असेल तर सलमान त्याच्या या उत्तरावर काय प्रतिक्रिया देतो, ते पाहणे इंटरेस्टिंग असेल.

सलमान खान आणि विवेक ओबेरॉय यांच्या भांडणाचे कारण ऐश्वर्या राय होती. ‘हम दिल दे चुके सनम’  च्या सेटवर सलमानचे ऐश्वर्यासोबत अफेयर सुरु होते. जवळपास दोन वर्ष रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर त्यांचे ब्रेकअप झाले. त्यावेळी ऐश्वर्याने सलमानवर मारहाण केल्याचा आरोप केला होता. त्यांनतर ऐश आणि विवेक यांच्यातील जवळीक वाढली. याचदरम्यान विवेकने अचानक एक पत्रपरिषद बोलवून सलमानवर जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप केला होता. या पत्रपरिषदेनंतर विवेक व सलमान कायमचे वैरी बनले. पुढे विवेक व ऐश्वर्याचेही ब्रेकअप झाले.
 


Web Title: vivek oberoi wants to ask this question to salman khan
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.