विवेक ऑबेरॉय म्हणतो या चित्रपटातील अनुभव अविस्मरणीय

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2018 05:46 PM2018-08-20T17:46:22+5:302018-08-21T08:00:00+5:30

'रुस्तम' या कन्नड सिनेमातून विवेक कन्नड चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे.

Vivek Oberoi says the experience in this film is unforgettable | विवेक ऑबेरॉय म्हणतो या चित्रपटातील अनुभव अविस्मरणीय

विवेक ऑबेरॉय म्हणतो या चित्रपटातील अनुभव अविस्मरणीय

googlenewsNext
ठळक मुद्दे'रुस्तम' चित्रपटात विवेक दिसणार पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत

अभिनेता विवेक ऑबेरॉयने विविध भूमिका साकारून बॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. आता तो कन्नडचा सुपरस्टार शिव राजकुमारसोबत काम करणार आहे. यावर्षी प्रदर्शित होणाऱ्या 'रुस्तम' या कन्नड सिनेमातून विवेक कन्नड चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार जेव्हा विवेक सोळा-सतरा वर्षांचा होता तेव्हा पहिल्यांदा शिव यांना भेटला होता. त्यावेळी ते मुंबईत चित्रीकरणासाठी आले होते. विवेक त्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीसोबत चित्रपटाच्या सेटवर त्यांना भेटायला गेला होता. त्यावेळी शिव राजकुमार यांनी चित्रपटाबाबत विचारले होते. मात्र त्यावेळी विवेक कन्नड सिनेमात पदार्पण करण्यास तयार नव्हता. पण, शिव राजकुमार यांचा स्वभाव विवेकला खूप भावला होता.
विवेक नेहमी आपल्या मित्रांना सहकार्य करण्यासाठी तयार असतो. जेव्हा त्याला शिव यांच्या चित्रपटात काम करण्याबाबत विचारले. त्यावेळी त्याने स्क्रीप्ट न ऐकता या चित्रपटात काम करण्यास होकार दिला. 'रुस्तम' हा दाक्षिणात्य इंडस्ट्रीतील बिग बजेट चित्रपट आहे. रवि वर्मा व जय अन्ना निर्मित या चित्रपटात दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीतील महेंद्र, शत्रु आणि हरीश उथानम हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहे. 
'रुस्तम' चित्रपटात विवेक पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. याबाबत विवेक म्हणाला की, मला वाटते की शिव अन्ना यांच्यासोबत चित्रपटात काम करणे माझ्या नशीबात लिहिलेले होते. माझ्या करियरमधील अविस्मरणीय असा हा अनुभव बनला आहे. 
विवेक कन्नड सिनेमा 'रुस्तम'मध्ये काय कमाल दाखवतो, हे पाहणे औत्सुकतेचे ठरणार आहे. 

 

Web Title: Vivek Oberoi says the experience in this film is unforgettable

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.