काय म्हणता? विवेक ओबेरॉयला पाचवेळा ऑफर केले गेले लोकसभेचे तिकिट!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2019 11:05 AM2019-04-19T11:05:40+5:302019-04-19T11:06:24+5:30

बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉय सध्या ‘पीएम नरेंद्र मोदी’ या आपल्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. खरे तर विवेकने ‘पीएम नरेंद्र मोदी’ साईन केला आणि तो भाजपाशी संबंधित आहे, अशी चर्चा सुरू झाली. पण तूर्तास तरी असे काहीही नसल्याचा खुलासा विवेकने केला आहे.

vivek oberoi reveals he had rejected offer to be member of parliament 5 times | काय म्हणता? विवेक ओबेरॉयला पाचवेळा ऑफर केले गेले लोकसभेचे तिकिट!

काय म्हणता? विवेक ओबेरॉयला पाचवेळा ऑफर केले गेले लोकसभेचे तिकिट!

googlenewsNext
ठळक मुद्देलोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘पीएम नरेंद्र मोदी’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्यात आली आहे.

बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉय सध्या ‘पीएम नरेंद्र मोदी’ या आपल्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. खरे तर विवेकने ‘पीएम नरेंद्र मोदी’ साईन केला आणि तो भाजपाशी संबंधित आहे, अशी चर्चा सुरू झाली. पण तूर्तास तरी असे काहीही नसल्याचा खुलासा विवेकने केला आहे. एका ताज्या मुलाखतीत तो यावर बोलला.
ना माझा भाजपाशी काही संबध आहे, ना माझ्या चित्रपटाचा भाजपाशी संबंध आहे. मी अनेकदा हे सांगितले आहे. ‘पीएम नरेंद्र मोदी’ या चित्रपटासाठी भाजपाने कुठल्याही प्रकारे फंडिंग केलेले नाही. हा चित्रपट बनवण्यामागे आमचा कुठलाही राजकीय अजेंडा नाही. असे असते तर खासदारकीचे तिकिट मी लगेच स्वीकारले असते. मला एकदा नाही तर पाचवेळा लोकसभेचे तिकिट ऑफर केले गेले. पण मी त्यास नकार दिला. कारण मी एक कलाकार आहे. राजकारण माझे काम नाहीच, असे विवेकने स्पष्ट केले.


पीएम नरेंद्र मोदी’च्या प्रदर्शनाची तारीख लांबल्यामुळे विवेक सध्या दु:खी आहे. तो यावरही बोलला. मीच नाही तर आमची अख्खी टीम दु:खी आहे. आम्हाला या चित्रपटाकडून प्रचंड अपेक्षा होत्या. हा चित्रपट बनवण्यासाठी आम्ही दीड वर्ष खर्च केले. अशात प्रदर्शनाच्या एकदिवस आधी चित्रपटावर बंदी लादली जात असेल तर दु:ख होणे साहजिक आहे. आमच्या चित्रपटामुळे मतदार प्रभावित होत असतील तर जाहिराती, राजकीय चर्चा आणि अग्रलेखांमुळेही प्रभावित होऊ शकतात. तूर्तास निवडणूक आयोग आमचा हा चित्रपट लवकरात लवकर रिलीज होऊ देईल, इतकीच आमची अपेक्षा आहे, असे विवेक म्हणाला.


लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘पीएम नरेंद्र मोदी’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्यात आली आहे.‘पीएम नरेंद्र मोदी’ हे बायोपिक दिग्दर्शक ओमंग कुमार यांनी दिग्दर्शित केले आहे. विवेक ओबेरॉय यात नरेंद्र मोदी यांची भूमिका साकारताना दिसणार आहे.

Web Title: vivek oberoi reveals he had rejected offer to be member of parliament 5 times

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.