Vivek Oberoi to become 'judge' on TV; Wife full of shock! Read the reason !! | विवेक ओबेरॉय टीव्हीवर बनणार ‘जज’; पत्नीला भरली धडकी! वाचा कारण!!

बॉलिवूडनंतर टीव्ही आणि वेब शोमध्ये बिझी असलेला अभिनेता विवेक ओबेरॉय लवकरच ‘इंडियाज बेस्ट ड्रामेबाज’ हा शो जज करताना दिसणार आहे. अलीकडे या शोच्या निमित्ताने विवेकने मीडियाशी संवाद साधला. मी या शोमध्ये काम करू नये, असे माझ्या पत्नीचे मत होते, असे विवेकने सांगितले. विशेष म्हणजे, यामागचे कारणही त्याने स्पष्ट केले़ त्याचे ते कारण ऐकून सगळेच जण हसत सुटले. होय, विवेक म्हणाला की, मी स्टंट करतो, तेव्हा माझी पत्नी घाबरत नाही. पण मी ‘इंडियाज बेस्ट ड्रामेबाज’ हा शो जज करतो, तेव्हा ती घाबरते, कारण मी या शोचे पहिले सीझन केले तेव्हा माझा मुलगा विवानचा जन्म झाला. दुसरे सीझन केले तेव्हा मुलगी अमाया आली. आता तिसरे सीझन करणार म्हटल्यावर माझी पत्नी प्रियंकाला धडकी भरली आहे. आता पुरे झाले आणि मुलं मला नकोत, असे ती मला म्हणाली. विवेक ओबेरॉयचे लग्न प्रियंका अल्वा हिच्याबरोबर झाले. प्रियंका कर्नाटकचे मंत्री जीवराज अल्वा यांची मुलगी आहे. या दांपत्याला दोन मुले आहेत. मुलाचे नाव विवान असून, मुलीचे नाव अमाया आहे. सध्या विवेक त्याच्या फिल्मी ट्रॅकवर परतण्यासाठी धडपड करीत आहे.  
 तूर्तास विवेक बॉलिवूडसोबतचं दाक्षिणात्य चित्रपटांतही बिझी़ लवकरच तो साऊथ सुपरस्टार मोहनलाल यांच्या ‘लुसिफर’ या चित्रपटात दिसणार आहे़ यात विवेक खलनायकाची भूमिका साकारधार आहे़ याशिवाय ‘इंसाईड एज2’ या वेबसीरिजमध्येही तो दिसणार आहे़

ALSO READ : ‘इंडियाज बेस्ट ड्रामेबाझ’च्या तिसऱ्या सिझनमध्ये विवेक ओबेरॉय दिसणार परीक्षकाच्या भूमिकेत

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता म्हणून विवेक ओबेरॉयला ओळखले जाते. शिवाय त्याचे वडील सुरेश ओबेरॉय यांच्यामुळेही त्याचे इंडस्ट्रीत वजन आहे. विवेकने रामगोपाल वर्मा यांच्या ‘कंपनी’ या चित्रपटातून त्याच्या फिल्मी करिअरला सुरुवात केली. या चित्रपटात तो अभिनेता अजय देवगण याच्यासोबत झळकला होता. विवेकच्या पहिल्याच चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर दमदार कमाई केल्याने त्याला सुरुवातीच्या काळात अनेक चित्रपटांच्या आॅफर्स होत्या. मात्र नंतरच्या काळात तो जणू काही पडद्यावरून गायबच झाला. त्यानंतर त्याला ‘मस्ती’ सिरिजमध्ये संधी मिळाली. काही दिवसांपूर्वीच तो ‘मस्ती’मधील त्याचा सहअभिनेता रितेश देशमुख याच्यासोबत ‘बॅँक चोर’मध्ये बघावयास मिळाला होता. या चित्रपटात त्याने एका दमदार पोलीस आॅफिसरची भूमिका साकारली होती.  
Web Title: Vivek Oberoi to become 'judge' on TV; Wife full of shock! Read the reason !!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.