‘विश्वरूपम2’ ठरणार कमल हासन यांचा अखेरचा चित्रपट?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2018 07:56 PM2018-08-06T19:56:39+5:302018-08-06T19:56:57+5:30

‘विश्वरूपम2’ हा कमल हासन यांना कदाचित अखेरचा सिनेमा ठरण्याची शक्यता आहे.

Vishwaroopam 2 Kamal Haasan’s last outing? | ‘विश्वरूपम2’ ठरणार कमल हासन यांचा अखेरचा चित्रपट?

‘विश्वरूपम2’ ठरणार कमल हासन यांचा अखेरचा चित्रपट?

googlenewsNext

कमल हासन यांचा ‘विश्वरूपम2’ लवरकच प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे. सध्या कमल हासन आपल्या या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये गुंतले आहेत. कमल यांनी आपल्या सिनेकारकिर्दीत अनेक सुपरहिट चित्रपट दिलेत. केवळ दाक्षिणात्यचं नाही तर हिंदी चित्रपटसृष्टीतही त्यांचे मोठे योगदान आहे. वयाच्या तिसऱ्या वर्षी अभिनयक्षेत्रात पाऊल ठेवणारे व सुमारे २०० वर चित्रपटांत काम करणारे कमल हासल आता दक्षिण भारतातील राजकारणात आपले पाय पसरवू पाहत आहेत आणि कदाचित म्हणूनचं ‘विश्वरूपम2’ हा कमल हासन यांना कदाचित अखेरचा सिनेमा ठरण्याची शक्यता आहे.
होय, अलीकडे एका मुलाखतीत कमल यांनी स्वत: याबद्दलचे संकेत दिले. आता माझा प्राधान्यक्रम बदलला आहे. आधी मी पूर्णवेळ अभिनेता होतो. पण आता पूर्णवेळ एका राजकीय पक्षाचा अध्यक्ष, एक राजकीय नेता असणार आहे. ‘विश्वरूपम2’नंतर माझा पूर्ण वेळ मी राजकारणाला देणार आहे. आता चित्रपटांची निर्मिती माझ्यासाठी महत्त्वाची नाही़. माझ्या राज्यासाठी, माझ्या राज्याच्या लोकांसाठी काही करणे, त्यांनी मला दिलेल्या प्रेमाची परतफेड करणे हेच यापुढे माझे काम असेल, असे कमल हासन म्हणाले.
लोकांना मी राजकीय नेता म्हणून नाही तर अभिनेता म्हणून अधिक आवडतो, मला माहित आहे. याचे कारण म्हणजे, त्यांनी सुरुवातीपासून अभिनेता म्हणूनचं माझ्यावर प्रेम केले आहे. आता माझ्यातील नेत्याची ओळख मी त्यांना करून देणार आहे. माझ्यातील या नेत्यावरही लोक तितकेच प्रेम करतील, हा माझा विश्वास आहे, असेही ते म्हणाले. विश्वरुपम २’ हा २०१४ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘विश्वरुपम’चा हा सिक्वल असून, १० ऑगस्टला तो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

अभिनेते रजनीकांत यांच्यानंतर कमल हासन यांनी राजकरणात एन्ट्री केली असून त्यांनी आपल्या नव्या पक्षाची घोषणा केली आहे. त्यांनी आपल्या नव्या राजकीय पक्षाचे नाव 'मक्कल नीथी मय्यम' असे जाहीर केले असून पक्षाचे चिन्ह आणि झेंड्याचेही अनावरण करण्यात आले आहे.  

Web Title: Vishwaroopam 2 Kamal Haasan’s last outing?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.