Virat Kohli gives 'Valentine gift' before Anushka Sharma | अनुष्का शर्माच्या आधी विराट कोहलीला 'या' व्यक्तिने दिले Valentine गिफ्ट !

अनुष्का शर्मा आणि क्रिकेटर विराट कोहली लग्नाच्या बंधनात गतवर्षी डिसेंबर महिन्यात अडकले आहेत. लग्नानंतर काही दिवसांतच दोघे आपआपल्या आयुष्यात बिझी झाले आहेत. एकीकडे विराट साऊथ आफ्रिकेच्या सिरिजमध्ये व्यस्त झाला आहे तर अनुष्का आपल्या चित्रपटाच्या शूटिंगसाठी भारतात परतली आहे. 

लग्नानंतर पहिल्या Valentine-डेचे गिफ्ट विराटला मिळाले आहे. ते अनुष्काकडून नाही तर त्याच्या सासरवाडी कडून. अनुष्काच्या आई-वडिलांनी विराटला गिफ्ट दिले आहे. 
मुंबई मिररच्या रिपोर्टनुसार अनुष्का शर्माचे वडील कर्नल अजय कुमार शर्मा नुकतेच लेखिका तेजस्विनी दिव्या नाईक यांच्या पुस्तक प्रकाशनाला आले होते. यावेळी त्यांना रोमाँटिक काव्य संग्रह दिसला. अनुकाच्या वडिलांनी तो काव्य संग्रह बघताच लेखिकेची स्वाक्षरी केलेली कॉपी आपल्या जावई आणि मुलीसाठी घेतली. लेखिका दिव्या यांचे अनुष्काच्या वडिलांशी मैत्रिचे संबंध आहेत. 

अनुष्काच्या परी चित्रपट पुढच्या महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या चित्रपटात अनुष्कासह   रिताभरी चक्रवर्ती आणि रजत कपूर लीड रोलमध्ये आहेत. अनुष्का या चित्रपटाची को-प्रोड्यूसर आहे. अनुष्का तिचा भाऊ करनेश शर्मासोबत हा चित्रपट बनवते आहे. प्रोसित रॉय या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. बंगाली स्टार परमब्रता चॅटर्जी यात एका महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे.

ALSO READ :   विराट कोहलीने ३४ वे शतक झळकविताच पत्नी अनुष्का शर्माने पतीचे असे केले कौतुक!

अनुष्का शाहरुख खानच्या झिरोमध्ये ही झळकणार आहे.यात त्याच्यासोबत कॅटरिना कैफसुद्धा असणार आहे.  यात शाहरुख खान एका  बुटक्या व्यक्तिची भूमिका साकारताना दिसणार आहे. या चित्रपटातील  शाहरूखची व्यक्तीरेखा ‘गेम आॅफ थ्रोन्स’ या इंग्रजी सीरिजमधील टीरिनयल लेनिस्टर या पात्रावर आधारित असल्याचे सांगितले जात आहे. आनंद एल राय दिग्दर्शित ‘झिरो’या चित्रपटात अनेक व्हिज्युअल इफेक्ट्स दिसणार आहेत. शाहरूखची कंपनी रेड चिलीज् व्हीएफएक्सकडे हे काम आहे.शाहरूखच्या या चित्रपटासाठी विदेशातून एक्सपर्ट बोलवले गेलेत, असेही कळतेय. यंदा नाताळच्या मुहूर्तावर म्हणजेच २१ डिसेंबरला ‘झिरो’ प्रदर्शित होणार आहे.  सध्या शाहरुख छोट्या पडद्यावरदेखील सक्रिय आहे. त्याचा टेड टॉक्स या कार्यक्रमाला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळते आहे. 
Web Title: Virat Kohli gives 'Valentine gift' before Anushka Sharma
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.