Virat-Anushka is still waiting for a house in a rented house, a dream house worth Rs 34 crores | विराट-अनुष्का राहतात भाड्याच्या घरात, ३४ कोटी रुपयांत खरेदी केलेल्या स्वप्नातील घराची अजूनही प्रतीक्षा

टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या लग्नाला २ महिने झालेत.लग्नानंतर विराट दक्षिण आफ्रिका दौ-यावर गेला तर अनुष्का परी सिनेमात बिझी होते.मात्र आता दोघंही आपापल्या कामामधून फ्री झालेत.त्यामुळे हे क्यूट कपल आपल्या घरी सुखी संसारात बिझी असेल असं तुम्हाला वाटेल. मात्र तसं नाही. दोघांचा सुखी संसार सुरु असला तरी तो स्वतःच्या हक्काच्या घरी नाही तर भाड्याने घेतलेल्या घरात सुरु आहे. लग्नानंतर हे दोघंही ३४ कोटींमध्ये खरेदी केलेल्या स्वप्नवत आलिशान घरात राहायला जाणार अशा चर्चा होत्या. मात्र तसं झालं नसून विराट आणि अनुष्का मुंबईत एका भाड्याने घेतलेल्या घरात राहत आहेत. याच घरात दोघांना किमान वर्षभर राहावं लागणार आहे. या घराचं महिन्याचे भाडे जवळपास १५ लाख रुपये असल्याचं बोललं जात आहे. वरळीमधील रहेजा लिजेंड या गगनचुंबी इमारतीच्या ४०व्या मजल्यावर हा फ्लॅट असून तो जवळपास २७०० चौ. फूट इतका आहे. २०१७ साली विराट आणि घरमालकामध्ये भाडेकरार झाला होता. करारावर विराटचा भाऊ विकासची सही आहे. या डीलमध्ये मुंबईतील लोकल पत्ता जो देण्यात आला आहे तो अनुष्काच्या वर्सोवा इथल्या बद्रीनाथ टॉवरचा आहे. २०१६ साली विराटने मुंबईतील ओमकार अपार्टमेंटमध्ये फ्लॅट खरेदी केला. ७००० चौ. फूट या फ्लॅटची किंमत ३४ कोटी इतकी आहे. मात्र विराट अनुष्काचे हे घर अद्याप तयार झाले नसून त्याला वर्षभराचा कालावधी लागणार आहे. विराटने दोन दिवसांपूर्वी या घराचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. मात्र यानंतर ओमकार बिल्डर्सने हे घर आपल्या अपार्टमेंटमध्ये नसल्याचे सांगितले आहे. मात्र आपल्या कॅम्पसजवळचा हा परिसर असल्याचे त्यांनी सांगितलंय.

Web Title: Virat-Anushka is still waiting for a house in a rented house, a dream house worth Rs 34 crores
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.