Viral Girl Priya Warri thanked your celebrated folks, watch the video! | व्हायरल गर्ल प्रिया वारियरने आपल्या खास अंदाजात मानले चाहत्यांचे आभार, पाहा व्हिडीओ !

सध्या संपूर्ण देशभरात व्हायरल गर्ल प्रिया प्रकाश वारियरचीच चर्चा आहे. तरुणांना तर प्रियाने अक्षरश: घायाळ केले आहे. प्रत्येक तरुणाला प्रियाच्या डोळ्यांची अदा घायाळ करीत आहे. प्रियाचा हा व्हिडीओ ‘ओरू अदार लव’ या मल्याळम चित्रपटातील असून, ‘मानिकया मलरया पूवी’ या गाण्यात तिच्या या घायाळ करणाºया अदा बघावयास मिळत आहेत. गाण्यात प्रिया प्रकाश विद्यार्थिनीच्या भूमिकेत बघावयास मिळत असून, शेजारच्या रांगेत उभ्या असलेल्या तिच्या मित्राला ती डोळ्यांनी इशारा करताना बघावयास मिळत आहे. तिच्या याच इशाºयावर सबंध तरुणाई सध्या फिदा झाली आहे. 

विशेष म्हणजे, संपूर्ण गाण्यात प्रिया केवळ ३० सेकंद स्क्रीनवर बघावयास मिळते. मात्र एवढ्याच कालावधीत तिच्या अदा अशा काही घायाळ करून गेल्या, प्रत्येकाच्याच मोबाइलमध्ये प्रियाचा हा व्हिडीओ असेल असे म्हटले तर चुकीचे ठरू नये. सुरुवातीला प्रिया तिच्या मित्राला डोळ्यांनी इशारा करते. त्यानंतर हळूच त्याला डोळा मारत असल्याने तिचे हे एक्सप्रेशन प्रत्येकालाच घायाळ करीत आहे. या व्ंिहडीओमध्ये प्रिया खूपच सुंदर दिसत आहे. 
 }}}} ">187K followers on Instagram. Thank you so much for your love and support pic.twitter.com/JRB1njByCb

— Priya Prakash Varrier (@priyapvarrier) February 11, 2018
दरम्यान, प्रिया या व्हिडीओमुळे रातोरात सुपरस्टार बनली असून, इंटरनेटवर तिच्या या व्हिडीओला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे. प्रेक्षकांचे मिळत असलेले उदंड प्रेम बघून प्रिया हरकून गेली असून, तिने त्याच अंदाजात प्रेक्षकांचे आभार मानण्यासाठी एक व्हिडीओ शेअर केला आहे. प्रियाने तिच्या ट्विटर अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला असून, त्यामध्येदेखील डोळ्यांनीच ती तिच्या चाहत्यांचे आभार मानताना दिसत आहे. या व्हिडीओमध्येदेखील प्रियाची स्माइल घायाळ करणारी आहे. 

या व्हिडीओला कॅप्शन देताना प्रिया प्रकाशने लिहिले की, तुम्हा सर्वांचे खूप आभार. मला एवढे प्रेम आणि पाठिंबा दिल्यामुळे मी हरकून गेले आहे. मी प्रत्येकाला रिप्लाय करू शकत नाही, परंतु तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करेल. पुढे तुमचे प्रेम असेच असू द्या.’
Web Title: Viral Girl Priya Warri thanked your celebrated folks, watch the video!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.