Viral Girl Priya Prakash wants to work with the director! | व्हायरल गर्ल प्रिया प्रकाशला करायचे ‘या’ दिग्दर्शकासोबत काम!

इंटरनेटवर एका व्हिडीओने अशी काही धूम उडविली की, तरुणांना त्यातील दोन्ही पात्रांनी अक्षरश: घायाळ केले. हा एक असा व्हिडीओ ज्यास जवळपास सर्वांनीच बघितले आहे. शिवाय सध्या प्रत्येकाच्या तोंडी या व्हिडीओचीच चर्चा आहे. प्रत्येकाच्या मोबाइलमध्ये हा व्हिडीओ असेल असे म्हटले तर ती अतिशयोक्ती ठरू नये. होय, हा व्हिडीओ मल्याळम चित्रपटातून डेब्यू करणाºया अभिनेत्री प्रिया प्रकाश वारियर हिचा. या व्हिडीओमुळे प्रिया रातोरात सुपरस्टार बनली आहे. आता प्रियाबद्दल एक बातमी समोर येत असून, तिला बॉलिवूडमध्ये एंट्री करण्याची इच्छा आहे. प्रियाला दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्यासोबत काम करायचे असल्याचे तिने बोलून दाखविले आहे. 

कालपर्यंत ज्या नावाला अन् चेहºयाला कोणी ओळखत नव्हते आज त्याच चेहºयावरील स्माइल अनेकांना वेड लावत आहे. ‘अदार लव’ या चित्रपटातील ‘माणिक्य मलराया पूवी...’ हे गाणे रिलीज झाले अन् कितीतरी लोकांनी ते बघितले. विशेष म्हणजे या गाण्यातील केवळ एका छोट्याशा क्लिपनेच तरुणांना असे काही वेड लावले की, लोक गाणे न बघता केवळ ही क्लिप बघणेच पसंत करीत आहे. या छोट्याशा क्लिपमुळे त्यात दिसणारे दोन्ही स्टार आज जबरदस्त प्रसिद्धीझोतात आले आहेत. आतापर्यंत या दोघांचा व्हिडीओ ८५ लाख लोकांनी बघितला आहे. दरम्यान, प्रियाने एका मुलाखतीत सांगितले की, मला संजय लीला भन्साळी यांच्यासोबत काम करायचे आहे. यावेळी प्रियाने तिच्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओबद्दल बोलताना हे अभूतपूर्व असल्याचे म्हटले. त्याचबरोबर मला अशाप्रकारच्या रिअ‍ॅक्शनची अपेक्षा नव्हती, असेही म्हटले. प्रियाने म्हटले की, रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण माझे फेव्हरेट कलाकार आहेत. सध्या प्रिया केरळमधील त्रिचूर येथील विमला कॉलेजमध्ये बी. कॉमचे शिक्षण घेत आहे. तिचा हा चित्रपट ३ मार्च रोजी रिलीज होत आहे. 
Web Title: Viral Girl Priya Prakash wants to work with the director!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.