'Viral Girl' is another 'Khalas' video of Priya Light Warrior! Look, 'Oru Adar Love' valentines day special teaser !! | ​‘व्हायरल गर्ल’ प्रिया प्रकाश वारियरचा आणखी एक ‘खल्लास’ व्हिडिओ !पाहा, ‘ओरू अडार लव’चा valentines day special teaser!!

आपल्या नजरेच्या बाणांनी अनेकांना घायाळ कळणारी मल्याळम अभिनेत्री प्रिया प्रकाश वारियर हिचा नवा व्हिडिओ समोर आला आहे.  जुन्या व्हिडिओत आपल्या प्रियकरासोबत ‘इशारों इशारों में’ बोलणारी प्रिया प्रकाश या नव्या व्हिडिओत फ्लार्इंग किसच्या गोळीने आपल्या बॉयफ्रेन्डला घायाळ करताना दिसतेय.  एका व्हिडिओने एका रात्रीत इंटरनेट सेन्सेशन बसलेल्या प्रियाचा हा अंदाजही कमालीची हिट झाला आहे.
आज व्हॅलेन्टाईन डेच्या दिवशी प्रियाच्या ‘ओरू अडार लव’ या आगामी सिनेमाचा टीजर रिलीज करण्यात आला.  या टीजरमधील प्रियाचा लूकही खल्लास करणारा आहे. क्लासरूममधील या सीनमध्ये प्रिया आपल्या बॉयफ्रेन्डला फ्लार्इंग किस देताना दिसतेय. काहीच तासांपूर्वी रिलीज झालेला हा टीजर आत्तापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे.ALSO READ : OMG! ‘व्हायरल गर्ल’ प्रिया प्रकाश वारियरला चुकवावी लागली मोठी किंमत; सोडावे लागले राहते घर!!

या व्हॅलेन्टाईन वीकमध्ये प्रियाची एक व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली होती.  ‘ओरू अडार लव’ या चित्रपटातील ‘मानिका मलयारा पूवी’ या गाण्याच्या या क्लिपने प्रिया प्रकाश एका रात्रीत स्टार झाली. ही क्लिप इतक्या वेगाने व्हायरल झाली की, एकाच दिवसांत प्रियाच्या इन्स्टाग्राम फॉलोवर्सची संख्या सहा लाखांवर पोहोचली. या फॅन फॉलोविंगने प्रियाला जगातील तिसरी पॉप्युलर इन्स्टा सिलेब्स बनवले. या व्हिडिओत प्रिया प्रकाश ‘आंखों ही आंखों में’ रोमान्स करताना दिसतेय. शाळेच्या दिवसांची आठवण करून देणाºया या व्हिडिओनंतर प्रिया डेब्यूआधीच लोकप्रीय झाली आहे. येत्या ३ मार्चला ‘ओरू अडार लव’ हा चित्रपट रिलीज होतो आहे. पण त्याआधीच प्रिया चर्चेत आली आहे. प्रियाच्या सौंदर्याचीही चर्चा होऊ लागली आहे. प्रिया ही केरळच्या त्रिशूरची राहणारी आहे.  डान्स आणि भटकंती हे तिचे आवडते छंद आहेत. बी कॉम फर्स्ट ईअरची विद्यार्थीनी असलेली प्रिया सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह आहे. ‘ओरू अडार लव’ या आपल्या पहिल्या चित्रपटात प्रिया एका किशोरवयीन मुलीच्या भूमिकेत आहे. किशोरवयात मनात फुलू लागलेल्या प्रेमाची कथा यात आहे.

Web Title: 'Viral Girl' is another 'Khalas' video of Priya Light Warrior! Look, 'Oru Adar Love' valentines day special teaser !!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.