Vin Diesel Deepika Padukone to chance again? | ​विन डिझेल दीपिका पादुकोणला पुन्हा देणार का संधी?

‘ट्रिपल एक्स : रिटर्न आॅफ जेंडर केज’ या चित्रपटात दीपिका पादुकोण आणि विन डिझेलची जोडी दिसली होती. या चित्रपटानंतर विन जणू दीपिकाच्या पे्रमात पडला होता. दीपिका असेल तर मी बॉलिवूडच्या चित्रपटातही काम करायला तयार आहे, असे विन म्हणाला होता. आता असे असताना ‘ट्रिपल एक्स : रिटर्न आॅफ जेंडर केज’च्या सीक्वलमध्ये दीपिकाची वर्णी लागणार नाही, असे कसे होईल?
होय, खबर तीच आहे. विनच्या ‘वन रेस फिल्म्स’ या प्रॉडक्शन हाऊसने म्हणे ‘एच कलेक्टीव्ह’ या प्रॉडक्शन हाऊससोबत ‘एक्सएक्सएक्स’ फ्रेन्चाइजीचे राईड्स खरेदी केले आहेत. म्हणजे आता विन या फ्रेन्चाइजीचा सहनिर्माता झाला आहे. याचसोबत विनने ‘ट्रिपल एक्स’ या सीरिजचा चौथा भाग घेऊन येण्याची तयारी सुरू केली आहे. साहजिकच या चौथ्या सीरिजमध्येही विन डिझेल हाच लीड रोलमध्ये असणार आहे. डी जे कारूसो हाच या चौथ्या सीरिजचा दिग्दर्शक असणार आहे. (त्यानेच ‘ट्रिपल एक्स : रिटर्न आॅफ जेंडर केज’ दिग्दर्शित केला होता.) केवळ इतकेच नाही तर ‘ट्रिपल एक्स4’मध्ये दीपिकाचीही एक महत्त्वपूर्ण भूमिका असणार असल्याचे कळतेय.  
‘ट्रिपल एक्स : रिटर्न आॅफ जेंडर केज’मध्ये दीपिकाने सेरेना उंगरची व्यक्तिरेखा साकारली होती. अर्थात या चित्रपटाने फार मोठी कमाई केली नव्हती. पण यातील दीपिकाच्या कामाचे मात्र प्रचंड कौतुक झाले होते. केवळ दीपिकाचीच नाही तर चित्रपटातील संपूर्ण स्टारकास्टच्या कामाची प्रशंसा झाली होती. त्यामुळे ‘ट्रिपल एक्स : रिटर्न आॅफ जेंडर केज’च्या सीक्वलमध्येही संपूर्ण स्टारकास्ट रिपीट करण्यात येणार आहे. एकंदर काय तर लवकरच दीपिका आपल्या दुसºया हॉलिवूड चित्रपटाच्या तयारीला लागणार आहे.

ALSO READ : दीपिका पादुकोणच्या आठवणींनी बेचेन होतोय हॉलिवूड स्टार विन डिझेल, वाचा आता त्याने काय केले!
Web Title: Vin Diesel Deepika Padukone to chance again?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.