Villagers appreciate Taapsee Pannu and Bhumi pednekar | म्हणून गावकऱ्यांनी 'या' दोन अभिनेत्रींचे टाळ वाजवून केले कौतूक, जाणून घ्या कोण आहेत या अभिनेत्री
म्हणून गावकऱ्यांनी 'या' दोन अभिनेत्रींचे टाळ वाजवून केले कौतूक, जाणून घ्या कोण आहेत या अभिनेत्री

ठळक मुद्देतापसी आणि भूमी पहिल्यांदाच एकत्र स्क्रिन शेअर करणार आहेत अनुराग कश्यप आणि निधी परमार या सिनेमाची निर्मिती करणार आहेत

भूमी पेडणेकर हिने आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात आपलं वेगळे स्थान निर्माण केले आहे. लवकरच भूमी तापसी पन्नूसोबत 'सांड की आँख' सिनेमात दिसणार आहे. सध्या या सिनेमाचे शूटींग मेरठ जवळच्या गावामध्ये सुरु आहे. शूटींग दरम्यान भूमी आणि तापसीला पाहण्यासाठी गावकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती. रणरणत्या उन्हात ऐवढ्या ग्लॅमरस अभिनेत्री आपलं काम शांतपणे करतायेत हे पाहुन गावकऱ्यांना त्यांचे कौतूक वाटले. त्यांचे शूटींग संपल्यावर गावतल्या लोकांनी त्यांना टाळ्यांच्या कडकडाटाने दाद दिली. भूमी आणि तापसी गावकऱ्यांनी दिलेल्या प्रतिसादाला पाहून अतिशय भारावून गेल्या आणि त्यांनी गावकऱ्यांसोबत जवळपास अर्धातास गप्पा मारल्या. 

'सांड की आँख' सिनेमाचे दिग्दर्शन आणि कथा तुषार हिरानंदानी यांची असणार असून अनुराग कश्यप आणि निधी परमार याची निर्मिती करणार आहेत. या सिनेमाच्या माध्यमातून तापसी आणि भूमी पहिल्यांदाच एकत्र स्क्रिन शेअर करणार आहेत.

जगातील एका वयस्कर शार्पशूटर महिलेवर या चित्रपटाची कथा आधारीत असून या महिलेच्या भूमिकेत तापसी दिसणार आहे. तापसीचा 'बदला' सिनेमा काही दिवसांपूर्वीच बॉक्स ऑफिसवर रिलीज झाला आहे. या सिनेमात तापसीने साकारलेल्या नैना सेठी या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले तर भूमी पेडणेकरने देखील सोन चिरैयामध्ये दमदार भूमिका साकारली आहे. त्यामुळे 'सांड की आँख' सिनेमात दोघींना एकत्र पाहण्यासाठी त्यांचे फॅन्स नक्कीच उत्सुक असतील. 
 


Web Title: Villagers appreciate Taapsee Pannu and Bhumi pednekar
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.