Vidya Balan sacrificed love for sister Story of love's first love story! | बहिणीसाठी विद्या बालनने केला प्रेमाचा त्याग! वाचा विद्याच्या पहिल्या प्रेमाची गोष्ट!!

अभिनेत्री विद्या बालन लवकरच ‘तुम्हारी सुलू’ या चित्रपटात दिसणार आहे. सध्या या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये विद्या व्यस्त आहे. पण खरे सांगायचे तर या चित्रपटाने कमी अन् नेहा धूपियाच्या ‘नो फिल्टर’ शोमध्ये दिलेल्या मुलाखतीमुळे विद्या सध्या अधिक चर्चेत आहे. ‘नो फिल्टर नेहा’ या नेहाच्या आॅडिओ चॅट शोमध्ये विद्या नुकतीच येऊन गेली आणि यादरम्यान तिने अनेक धक्कादायक खुलासे केलेत. यातलाच एक खुलासा म्हणजे, बहीणीसाठी आपले प्रेम त्यागण्याचा. होय, हा अगदी पर्सनल अनुभव विद्याने शेअर केला. आता विद्या पती सिद्धार्थ राय कपूरच्या प्रेमात असती तरी विद्याचे पहिले प्रेम सिद्धार्थ नाही तर दुसरेच कुणी होते. याच पहिल्या प्रेमाबद्दल विद्याने एक कटु आठवण सांगितली. तो मला खूप आवडायचा...इथून विद्याने सुरुवात केली. ‘तो मला खूप आवडायचा. पण अचानक तो माझ्यावर नाही तर माझ्या बहिणीवर प्रेम करतो, हे मला कळले. ते दोघेही एकमेकांना डेट करत असल्याचेही मला कळले. मग काय, ती वेळ बहिणीसाठी माझ्या प्रेमाचा त्याग करण्याची होती. तो माझ्यापेक्षा माझ्या बहिणीचा चांगला जोडीदार बनू शकतो ,असे मला वाटले आणि मग मी त्याला विसरण्याचा निर्णय घेतला. माझ्या प्रेमाचा अंत झाला,’असे विद्याने सांगितले.

अर्थात विद्या प्रेम करायची ‘तो’ कोण, हे मात्र तिने गुलदस्त्यात ठेवले. पण एक मात्र खरे, विद्याने हा किस्सा सांगितला म्हणजे, अद्यापही ती त्याला विसरू शकलेली नाही. पहिले प्रेम विसरता येत नाही, असे म्हणतात ते उगीच नाही.

‘तुम्हारी सुलू’या चित्रपटाची कथा सुलू या स्त्रीच्या अवतीभवती फिरणार आहे. सुलू ही व्यक्तिरेखा विद्या बालन साकारणार असून ती या चित्रपटात आरजेच्या भूमिकेत दिसणार आहे. तिने याआधी देखील ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ या चित्रपटात आरजेची भूमिका साकारली होती. ही सुलू रात्रीच्या शोंचे सूत्रसंचालन करत असल्याचे आपल्याला पाहायला मिळणार आहे.  ‘तुम्हारी सुलू’ या चित्रपटाचे दिग्दर्शन सुरेश त्रिवेदी करत असून या चित्रपटात नेहा धूपिया देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. 


Web Title: Vidya Balan sacrificed love for sister Story of love's first love story!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.