Vidya balan dengue! | ​विद्या बालनला झाला डेंग्यू !

महाराष्ट्राची राजधानी मुंबईत पावसासह साथीच्या आजाराने थैमान घातले असून याची लागण सर्वसामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत पोहचली आहे. ‘कहानी २’ची शूटिंग आटोपून विद्या बालन नुकतीच अमेरिकेतून मुंबईला परतली. मात्र तिला लगेच ‘डेग्यू’ची लागण झाली. 
विद्यावर घरीच उपचार सुरू  असून डॉक्टरांनी तिला १० दिवस विश्रांती करण्याचा सल्ला दिला आहे. ती राहत असेलल्या इमारतीच्या गच्चीवर डेंग्यूच्या अळ्या सापडल्या. मात्र त्या अळ्या नष्ट केल्याचा दावा पालिका अधिकाऱ्यानी केला आहे. अनिल कपूर आणि जुही चावला यांच्या घरीही डेंग्यूच्या अळ्या सापडल्या. त्यामुळे महापालिकेने त्यांना नोटीसही बजावली होती. बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक यश चोप्रा यांचा 2012 मध्ये डेंग्यूमुळेच मृत्यू झाला होता.
Web Title: Vidya balan dengue!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.