Video:यामी गौतमला आहे 'या' गोष्टीची आवड,व्हिडीओ शेअर करत दिली माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2018 11:38 AM2018-07-12T11:38:31+5:302018-07-12T11:44:00+5:30

तासनतास जिममध्ये घाम गाळण्यापेक्षा फिटनेस मेंटेन करायचे असेल तर पोल डान्स हा चांगला पर्याय असून स्वतःला फिट ठेवण्यात मदत होते असे यामीने सांगितले आहे.

Video: Yami Gautam gives us a glimpse of her passion for pole dance | Video:यामी गौतमला आहे 'या' गोष्टीची आवड,व्हिडीओ शेअर करत दिली माहिती

Video:यामी गौतमला आहे 'या' गोष्टीची आवड,व्हिडीओ शेअर करत दिली माहिती

आपले आवडते कलाकार शूटिंग व्यतिरिक्त त्यांच्या  खासगी आयुष्याविषयी जाणून घेण्याची रसिकांमध्ये उत्सुकता असते. सतत लाईट, कॅमेरा आणि अ‍ॅक्शनच्या झगमगाटात राहणारे हे कलाकार कधी वेळ मिळालाच तर मस्त एन्जॉय करताना दिसतात. आता हेच पाहा ना, यामी गौतमने एक पोल डान्स व्हिडीओ केला आहे. खुद्द यामीनेच हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओत ती एका गाण्यावर पोल डान्स करताना दिसतेय.हा पोल डान्स करतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत चर्चेचा विषय ठरतोय.आपल्या हॉट आणि सेक्सी अंदाजात रसिकांना घायाळ करणारी यामी प्रत्यक्ष जीवनातही आपल्या मादक अदांची जादू दाखवत आहे.फिटनेस आणि डान्सवर काम करण्यासाठी पोल डान्सिंग सर्वात चांगली पध्दत असल्याचे यामीला वाटते.प्रोफेशनल पोल डान्सर आरिफा भिंडरवाला यांच्याकडून ती पोल डान्स शिकत आहे.

तासनतास जिममध्ये घाम गाळण्यापेक्षा फिटनेस मेंटेन करायचे असेल तर पोल डान्स हा चांगला पर्याय असून स्वतःला फिट ठेवण्यात मदत होते असे यामीने सांगितले आहे.तर दुसरीकडे यामीचा हा पोल डान्स पाहून अनेकांनी तिला कोणत्या सिनेमासाठी पोल डान्स शिकत असल्याचे प्रश्न विचारले होते. त्यावेळी चित्रपटासाठी पोल डान्स शिकत नसून स्वत:ला फिट ठेवण्यासाठी शिकत असल्याचे म्हटले होते. 

यामीने 2012 मध्ये 'विकी डोनर' या फिल्ममधून बॉडीवूडमध्ये पदार्पण केले होते. यासोबतच तिचने 'अॅक्शन जॅक्सन', 'टोटल सफाया', 'बदलापुर', 'सनम रे', 'जुनूनियत', 'काबिल', 'सरकार 3' या सिनेमात विविधारंगी भूमिका साकारत तिने इंडस्ट्रीमध्ये आपली खास ओळख बनवली आहे. तसेत आगामी 'बत्ती गुल मीटर चालू' सिनेमासाठी यामी सध्या मुंबई हायकोर्टाच्या चक्कर काढताना दिसतेय. सिनेमात वकिलाची भूमिका ती साकारते आहे. भूमिकेच्या तयारीसाठी ती कोर्टात जात असते. तसेच वीज कंपनीच्या पाय-या झिजवणाऱ्या सामान्य माणसाची कथा सिनेमात दिसणार असल्याचे कळते.सिनेमात यामी गौतमसह शाहिद कपूर आणि श्रद्धा कपूरही झळकणार आहे. यामी फक्त 'बत्ती गुल मीटर चालू' सिनेमातच नाही तर 'उडी'या शिनेमाच्याही शूटिंगमध्येही व्यस्त आहे.

Web Title: Video: Yami Gautam gives us a glimpse of her passion for pole dance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.