Video: What happened to Deepika Padukone in front of Shahrukh Khan? | video : ​असे काय झाले की, शाहरूख खानसमोर हुमसून हुमसून रडू लागली दीपिका पादुकोण?

शाहरूख खान व दीपिका पादुकोण यांची मैत्री जगजाहिर आहे. शाहरूखच्या म्हणण्यावर दीपिका काहीही करायला तयार होईल, इतकी ही मैत्री घनिष्ठ आहे. शाहरूखचाही दीपिकावर तितकाच जीव आहे. म्हणूनच अतिशय व्यस्त असूनही  दीपिका शाहरूखचा वाढदिवस साजरा करण्यासाठी अलिबागला पोहोचली होती. अलीकडे ‘पद्मावती’ चित्रपटामुळे दीपिकाला जीवे मारण्याची धमकी मिळाल्यावर, तिची आस्थेने चौकशी करणारा शाहरूख पहिला होता. त्याने दीपिकाला फोन करून तिला हिंमत दिली होती. पण अगदी ताजा प्रसंग सांगायचा तर शाहरूखने दीपिकाला चांगलेच रडवले. हसता हसता वातावरण इतके गंभीर झाले की, दीपिकाच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. नुकत्याच एका शोमध्ये शाहरूखने दीपिकाची मुलाखत घेतली. शाहरूख नेहमीप्रमाणे दीपिकाची प्रशंसा करत होता. दीपिकाही अतिशय आनंदात होती. पण अचानक शाहरूख एक पत्र वाचू लागला आणि दीपिकाला आपल्या भावना रोखणे कठीण झाले. तिच्या डोळ्यांत अश्रू तरळले. हे पत्र दीपिकाची आई उज्जवला पादुकोण यांनी दीपिकाला लिहिलेले होते. शाहरूखने दीपिकाच्या आईचे हे पत्र सर्वांसमोर वाचून दाखवले. ‘मला तुझा अभिमान आहे. तू तुझ्या क्षेत्रात भरीव कामगिरी करते आहेस. लहानपणी तू एक टॉमबॉय होती. इथपर्यंत पोहोचण्यासाठी तू प्रचंड कष्ट घेतलेस. सर्वांसाठी तू मोठी अभिनेत्री असशील. पण माझ्यासाठी तू माझी तीच तान्हुली आहेस. तू कधीच मोठी होऊ शकत नाहीस,’ असे या पत्रात लिहिलेले होते. शाहरूख हे पत्र वाचत होता आणि दीपिकाचे अश्रू वाहत होते. एका क्षणाला दीपिका प्रचंड भावूक झाली. अखेर शाहरूखने तिचे अश्रू पुसत तिला प्रेमाची झप्पी दिली. 

ALSO READ : रणवीर सिंगने अशा अनोख्या स्टाईलमध्ये व्यक्त केले दीपिका पादुकोणवरचे प्रेम!

तूर्तास दीपिका ‘पद्मावती’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. पण हा चित्रपट सध्या वादात सापडला आहे. अनेक राजपूत संघटना व राजकीय नेत्यांनी या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी टाकण्याची मागणी पुढे रेटली आहे.  ‘पद्मावती’त ऐतिहासिक तथ्यांशी छेडछाड केल्याचा या सर्वांचा दावा आहे.
Web Title: Video: What happened to Deepika Padukone in front of Shahrukh Khan?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.