Video Viral: Rich Media on Social Media Such a rage !! | Video Viral : ​सोशल मीडियावर संतापली रिचा चड्ढा! असा काढला राग!!

रिचा चड्ढाचा अलीकडे आलेला ‘फुकरे रिटर्न्स’ हा चित्रपट चांगलाच सुपरहिट राहिला. या चित्रपटाचे रिचाने सोशल मीडियावर जोरदार प्रमोशन केले होते. पण आताश: रिचा सोशल मीडियाला वैतागली आहे. होय, जाम वैतागली आहे. सोशल मीडिया, सेल्फीसाठीचा खटाटोप हे सगळे जणू तिला खोटे वाटू लागलेय. आता आम्ही हे इतक्या दाव्यानिशी कसे म्हणू शकतो तर, रिचाचा ताजा व्हिडिओ पाहून. होय, या ताज्या व्हिडिओमध्ये तरी हेच दिसतेय.
आता तुम्ही आणखी गैरसमज करू घेण्याआधी आम्ही सांगू इच्छितो की, हा व्हिडिओ म्हणजे एक ‘सिंगल’ आहे. होय, शिबानी कश्यपचे नवे गाणे ‘वाना बी फ्री’चा हा व्हिडिओ आहे. या गाण्याच्या व्हिडिओत रिचा जबरदस्त अंदाजात पाहायला मिळतेय. सध्या या गाण्याने इंटरनेटवर धूम केली आहे. सोशल मीडियाच्या आहारी गेलेल्या लोकांना या गाण्यातून रिचाने सावध केले आहे. सोशल मीडियाचा वापर जबाबदारीने कराल तर ते एक वरदान आहे. अन्यथा यापासून तुम्हाला दूर जाण्याची गरज आहे, असा संदेश हे गाणे देते.अलीकडे सेल्फीसाठी पाठलाग करणा-यांना रिचाने चांगलेच फटकारले होते. ‘वांद्रयात काही अतिउत्साही चाहत्यांनी बाईकवरून माझा पिच्छा पुरवला. तुमच्यासारखी मंडळी पादचारी आणि अन्य वाहनांच्या सुरक्षेसाठी धोका आहात. फोटो काढण्यासाठी विचारण्याची ही कुठली पद्धत आहे? सुधरा...’, असे तिने लिहिले होते.  

ALSO READ : सुधर जाइए! चाहत्यांच्या वागण्याने संतापली रिचा चड्ढा !!

रिचा चड्ढाने ‘ओए लकी लकी ओए’ या चित्रपटापासून तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर ‘गँग्स आॅफ वासेपूर’,‘फुकरे’, ‘मसान’ यांसारख्या चित्रपटात तिने भूमिका साकारल्या. रिचाने आज बॉलिवूडमध्ये स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले आहे. अर्थात यासाठी तिला बराच संघर्ष करावा लागला. बॉलिवूडमध्ये कुणीही गॉडफादर नसल्याने बॉलिवूडमध्ये स्थिरावणे तिला बरेच जड गेले. पण रिचाने स्वबळावर यश मिळवले. 

 
Web Title: Video Viral: Rich Media on Social Media Such a rage !!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.