Video: No Trust; Ranveer Singh is Arjun Kapoor's 'Half Girlfriend' | Video : ​श्रद्धा नव्हे; रणवीर सिंह आहे अर्जुन कपूरची ‘हाफ गर्लफ्रेन्ड’

अर्जुन कपूरची ‘हाफ गर्लफ्रेन्ड’ कोण? असे कुणी विचारलेच तर सध्यातरी श्रद्धा कपूर असेच उत्तर मिळेल. अहो, या दोघांचा ‘हाफ गर्लफ्रेन्ड’ हा चित्रपट जो येतोय. पण असे नाहीच मुळी. अर्जुन कपूरची ‘हाफ गर्लफ्रेन्ड’ श्रद्धा कपूर नव्हे तर रणवीर सिंह आहे. होय, अर्जुनने त्याच्या सोशल अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत अर्जुन त्याच्या ‘हाफ गर्लफ्रेन्ड’ची ओळख करून देताना दिसतोय. या व्हिडिओत अर्जुन कपूर रणवीरला इंट्रोड्यूस करतोय. कॅमेरा अर्जुनच्या उजव्या साईड  जातो आणि फ्रेममध्ये श्रद्धा कपूर दिसते. मग अर्जुन कॅमेरा आणखी उजवीकडे घ्यायला सांगतो. मी ज्याच्याबद्दल बोलतोय, तो तिथे आहे, असे अर्जुन म्हणतो आणि लगेच फ्रेममध्ये रणवीर सिंह दिसायला लागतो. क्षणात रणवीर अर्जुनला मिठी मारतो. हाय, मी अर्जुनची रिअल लाईफ गर्लफ्रेन्ड आहे, असे सांगत रणवीर बाजूला उभ्या असलेल्या श्रद्धाला ‘कलमुही’ म्हणतो. एकंदर काय, तर हा व्हिडिओ म्हणजे धम्माल मस्ती आहे.ALSO READ : ​‘हाफ गर्लफ्रेन्ड’चे नवे गाणे ‘लॉस्ट विदाऊट यू’ रिलीज !

खरे तर रणवीर आणि अर्जुन कपूर या दोघांचा ‘दोस्ताना’ आजचा नाही. ‘गुंडे’मध्ये अर्जुन व रणवीर एकत्र दिसले आणि दोघांचीही मैत्री फुलली. ‘गुंडे’ चालला नाही. पण या चित्रपटानंतर रणवीर व अर्जुनमध्ये चांगलेच प्रेम बहरले. भावांपेक्षा जास्त आणि लव्हरप्रेक्षा कमी, असेच हे प्रेम आहे. याआधीही रणवीरने स्वत:ला अर्जुनची ‘हाफ गर्लफ्रेन्ड’म्हटले होते. ‘हाफ गर्लफ्रेन्ड’च्या ट्रेलर लॉन्चनंतर अर्जुनबद्दलचे प्रेम त्याने व्यक्त केले होते.  ‘मला आता रडायला येतंय बाबा...तिला तुझे हाफ व्हायचे आहे. पण मी तुझा तो पूर्ण हाफ आहे,’ असे टिष्ट्वट रणवीरने केले होते.  यावर अर्जुननेही असेच मजेशीर उत्तर दिले होते. ‘तू मेरा भाई है और वो मेरी जान. अपने भाई के लिए में अपनी जान भी दे सकता हूं पगले. तुम मेरे फुल अ‍ॅण्ड फायनल हो,’ असे अर्जुनने लिहिले होते.
Web Title: Video: No Trust; Ranveer Singh is Arjun Kapoor's 'Half Girlfriend'
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.