video: कुणी काय बोलावं, हे मी कसं ठरवणार? तनुश्री दत्ताच्या आरोपांवर नाना पाटेकर यांनी सोडले मौन!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2018 07:12 PM2018-09-27T19:12:07+5:302018-09-27T19:12:45+5:30

तनुश्रीच्या आरोपांमुळे सर्वत्र खळबळ माजली असताना नाना यावर मौन साधून होते. मात्र आज त्यांनी यावर मौन सोडत, तनुश्रीचे सगळे आरोप फेटाळून लावले.

video: nana patekar reacts on tanushree duttas assault allegations against him | video: कुणी काय बोलावं, हे मी कसं ठरवणार? तनुश्री दत्ताच्या आरोपांवर नाना पाटेकर यांनी सोडले मौन!

video: कुणी काय बोलावं, हे मी कसं ठरवणार? तनुश्री दत्ताच्या आरोपांवर नाना पाटेकर यांनी सोडले मौन!

googlenewsNext

इमरान हाश्मी स्टारर ‘आशिक बनाया आपने’ची हिरोईन तनुश्री दत्ता हिने अभिनेता नाना पाटेकर यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपांमुळे इंडस्ट्रीत खळबळ माजली आहे. ताज्या मुलाखतीत तनुश्रीने २००८ सालचे एक प्रकरण पुन्हा एकदा उखरून काढत, नानांवर गंभीर आरोप केले आहेत. २००८ साली ‘हॉर्न ओक प्लीज’ या चित्रपटाच्या सेटवर नाना पाटेकर यांनी माझ्याशी गैरवर्तन केले होते आणि मनसेकडून धमकावले होते, असा तनुश्रीचा आरोप आहे. गेल्या दोन दिवसांपासून तनुश्रीच्या या आरोपांमुळे सर्वत्र खळबळ माजली असताना नाना यावर मौन साधून होते. मात्र आज त्यांनी यावर मौन सोडत, तनुश्रीचे सगळे आरोप फेटाळून लावले.



 

सेटवर १००-२०० लोक हजर होते. या सर्वांसमोर मी तिच्यासोबत गैरवर्तन केले, असे ती का म्हणतेय, मला ठाऊक नाही़ शेवटी कुणी काय बोलाव, हे मी कसे ठरवणार. मी फक्त एवढेचं सांगेल की, कुणी काहीही म्हणो, मला माझ्या आयुष्यात जे करायचे तेच मी करणार, असे नाना पाटेकर ‘ मिरर  नाऊ’ सोबत बोलताना म्हणाले. या प्रकरणात तनुश्रीविरोधात कायदेशीर कारवाई करणार का, या प्रश्नाचे उत्तर मात्र त्यांनी टाळले. बघूया, मला जे करायचे ते मी करणार, केवळ एवढेच ते बोलले.

तनुश्रीच्या या आरोपानंतर गणेश आचार्य याने मीडियासमोर येते, नाना पाटेकर यांचा बचाव केला होता.
नेटवर्क 18 सोबत बोलताना गणेश आचार्यने सगळे आरोप खोडून काढले होते. एक तर हे खूप जुने प्रकरण आहे. त्यामुळे नेमके काय झाले होते, हे मला नीट आठवत नाही. पण मला जितके आठवते त्यानुसार, एक डूएट गाणे होते. त्यादिवशी सेटवर काहीतरी झाले होते आणि शूटींग 3-4 तास थांबवण्यात आले होते. कलाकारांमध्ये गैरसमज   होते. पण मी इतके खात्रीपूर्वक सांगेल की, जे काही आरोप होत आहेत, तसे काहीही घडले नव्हते. नानाने कुण्याच् राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांना सेटवर बोलवले होते, हा आरोपचं खोटा आहे.  नाना पाटेकर एक चांगली व्यक्ती आहे़. ते असे काहीच करू शकत नाहीत. ते कायम लोकांची मदत करतात. बॉलिवूडमध्ये असे अनेक लोक आहेत, ज्यांच्यावर नानांचे उपकार आहेत, असे गणेश आचार्य म्हणाला होता.

Web Title: video: nana patekar reacts on tanushree duttas assault allegations against him

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.