VIDEO: Half a dozen Bodyguard, hundreds of fans and losers! | VIDEO : अर्धा डझन बॉडीगार्ड, शेकडो चाहते अन् धपकन् पडली काजोल !!
VIDEO : अर्धा डझन बॉडीगार्ड, शेकडो चाहते अन् धपकन् पडली काजोल !!
 ‘प्यार तो होना ही था’ या चित्रपटातील काजोल क्षणाक्षणाला गडबडते, धडपडते, पडते. आम्हाला हा सीन आठवण्याचे कारण म्हणजे, काजोलचा सध्या वेगाने व्हायरल होत असलेला व्हिडिओ. होय, इंटरनेटवर हा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हालाही ‘प्यार तो होना ही था’मधील काजोल आठवल्याशिवाय राहणार नाही. हा व्हिडिओ आहे मुंबईच्या एका मॉलमधला. या मॉलमध्ये काजोल स्टोर लॉंचिंग इव्हेंटला पोहोचली. मॉलमधील एलिवेटर चढून काजोल चालू लागली. 

yes   व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

​ सुमारे अर्धा डझन बॉडीगार्डस आणि तिचा पर्सनल स्टाफ सोबत घेऊन काजोल काही पाऊले पुढे गेली आणि अचानक तिची सँडल डगमगली आणि काजोल धपकन खाली पडली. काजोलला अचानक काय झाले, हे क्षणभर कुणालाचं कळले नाही. यानंतर बॉडीगार्ड्सनी काजोलला उचलले. खरे शेकडो लोकांच्या गर्दीसमोर असे पडणे म्हणजे, लाजीरवाणी बाब. पण काजोलने ती अगदी सहजरित्या घेतली आणि यानंतर तिने इव्हेंट पूर्ण केला. काही झालेच नाही, अशा थाटात तिने आपल्या अनेक चाहत्यांसोबत फोटोही काढून घेतले. पण काजोलला ज्यांनी कुणी पडताना पाहिले, त्यांना मात्र हमखास ‘प्यार तो होना ही था’मधील काजोल आठवली.
काजोलचा हा व्हिडिओ आम्ही बातमीसोबत देत आहोत, तो तुम्हीही पाहा आणि तो पाहिल्यानंतर तुमच्या मनात नेमक्या काय भावना येतात, ते आम्हाला जरूर कळवा.  ‘इनक्रेडिबल्स2’ या हॉलिवूड कार्टून फिल्ममध्ये काजोलचा आवाज दिसणार आहे. हिंदी डब असलेल्या या चित्रपटातील हेलेन पर्लचे पात्र काजोलच्या आवाजात बोलताना दिसतेय. आज हा चित्रपट भारतात रिलीज होतो आहे.   काजोलच्या बॉलिवूड चित्रपटांबद्दल सांगायचे तर, लवकरच ती पुन्हा एकदा कमबॅक करतये. तिच्या आगामी चित्रपटाचे नाव ‘ईला’ असे असून, त्यामध्ये ती एक मुलाच्या आईची भूमिका साकारताना बघावयास मिळणार आहे. ‘ईला’ या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रदीप सरकार करणार आहेत. चित्रपटात राष्टÑीय पुरस्कार विजेता रिद्धी सेन हादेखील बघावयास मिळणार आहे. तो काजोलच्या मुलाची भूमिका साकारणार आहे. 
  
 
Web Title: VIDEO: Half a dozen Bodyguard, hundreds of fans and losers!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.