Video Goes Viral: Salman Khan appeared to have a half-timer backflip! Look, video !! | Video Goes Viral​ : अर्ध्यारात्री बॅकफ्लिप मारताना दिसला सलमान खान! पाहा, व्हिडिओ!!

बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी फिटनेसबाबत प्रचंड दक्ष आहेत. सलमान खानबद्दल बोलायचे तर तो फिटनेसवर लक्ष देतो. पण म्हणून केवळ लोकांना दाखवण्यासाठी जिममधील स्वत:चे व्हिडिओ शेअर करत बसण्याच्या भानगडीत पडत नाही. त्यामुळेचं आत्तापर्यंत  केवळ स्क्रिनवर शर्ट उतरवण्याइतकाच सलमानचा ‘फिटनेस’ आपण पाहिला. पण आता आम्ही सलमानचा एक ‘दुर्मिळ’ व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. होय,‘सुल्तान’चा दिग्दर्शक अली अब्बास जफर याने सलमानचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. विशेष म्हणजे, हा व्हिडिओ रात्री २ वाजताचा आहे. यात सलमान बॅकफ्लिप करताना दिसतोय. अर्थात बॅकफ्लिप करताना सलमानला दोन लोकांनी सपोर्ट केला आहे. पण तरिही यातील सलमानची एनर्जी पाहून तुम्ही अवाक् झाल्याशिवाय राहणार नाहीत. अली अब्बासने हा व्हिडिओ शेअर करताना तो ‘सुल्तान’च्या ट्रेनिंगदरम्यानचा असल्याचे सांगितले आहे. या व्हिडिओला आत्तापर्यंत लोकांनी १७०० पेक्षा अधिक वेळा रीट्वीट केले आहे.सध्या अली अब्बास जफर व सलमान खान दोघेही ‘भारत’ या आगामी चित्रपटाच्या प्री-प्रॉडक्शनमध्ये बिझी आहेत. अली अब्बासने याबद्दलही माहिती दिली आहे. ‘भारत’ची तयारी जोरात सुरू आहे. लवकरच तुम्हाला या चित्रपटाबद्दलची आणखी रोचक माहिती मिळेल.‘भारत’ हा सलमानसोबतचा दिग्दर्शक अली अब्बासचा तिसरा चित्रपट असणार आहे. याआधी ‘सुल्तान’ आणि ‘टायगर जिंदा है’ या दोन चित्रपटात सलमान व अली अब्बासने एकत्र काम केले. ‘भारत’  हा पुढीलवर्षी ईदच्या मुहूर्तावर रिलीज होईल. हा चित्रपट दक्षिण कोरियाच्या ‘ओडी ट माइ फादर’ या चित्रपटावर बेतलेला असल्याचे कळलेय.

ALSO READ : Watch Video : कॅटरिना कैफचे अश्रू सलमान खानला झाले असह्य; मग केले असे काही...?

‘भारत’मध्ये सलमानच्या अपोझिट कॅटरिना कैफ आणि प्रियांका चोप्रा यांची नावे फायनल झाल्याचीही बातमी आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघींच्याही यात वेगवेगळ्या आणि महत्त्वपूर्ण भूमिका असतील. असे झाले तर प्रियांका व कॅटरिना पहिल्यांदा एकत्र काम करतील.   प्रियांका व सलमान हे दोघे सुद्धा सुमारे दशकभरानंतर एकत्र स्क्रीन शेअर करतील. यापूर्वी सलमान व प्रियांकाने ‘सलाम ए इश्क’मध्ये एकत्र काम केले आहे.
Web Title: Video Goes Viral: Salman Khan appeared to have a half-timer backflip! Look, video !!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.