विकी कौशलचे ब्रेकअप; कॅटरिना कैफ तर नाही कारण ?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2019 02:11 PM2019-03-17T14:11:30+5:302019-03-17T14:15:53+5:30

अलीकडे एका शोमध्ये विकीने त्याच्या पर्सनल लाईफबद्दल मोठा खुलासा केला होता. अभिनेत्री हरलीन सेठीसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचे त्याने सांगितले होते. पण आता या कपलच्या ब्रेकअपची खबर आहे.

vicky kaushal breaks up with harleen sethi unfollows on instagram | विकी कौशलचे ब्रेकअप; कॅटरिना कैफ तर नाही कारण ?

विकी कौशलचे ब्रेकअप; कॅटरिना कैफ तर नाही कारण ?

googlenewsNext
ठळक मुद्देकाही दिवसांपूर्वी ‘कॉफी विद करण’ या शोमध्ये करण जोहर कॅटरिनावरून विकीची फिरकी घेताना दिसला होता.

एकापाठोपाठ एक हिट चित्रपट देणारा अभिनेता विकी कौशलच्या खासगी आयुष्यात फार काही ‘आॅल वेल’ नसल्याची ताजी बातमी आहे. विकीच्या नुकत्याच रिलीज झालेल्या ‘उरी- द सर्जिकल स्ट्राईक’ या चित्रपटाने १०० कोटींवर कमाई केली. या चित्रपटानंतर विकी कौशल हे नाव ‘ए लिस्ट स्टार्स’च्या यादीत पोहोचले. साहजिकच विकीच्या पर्सनल लाईफबद्दल जाणून घेण्याची चाहत्यांची उत्सुकता वाढली. अलीकडे एका शोमध्ये विकीने त्याच्या पर्सनल लाईफबद्दल मोठा खुलासा केला होता. अभिनेत्री हरलीन सेठीसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचे त्याने सांगितले होते. केवळ इतकेच नाही तर या खुलाशानंतर हरलीनने विकीसोबतचा एक फोटो शेअर करत, या रिलेशनशिपवर शिक्कामोर्तब केले होते. पण आता या कपलच्या ब्रेकअपची खबर आहे. होय, हरलीनने विकीला इन्स्टाग्रामवर अनफॉलो केले आहे. शिवाय काही ब्रेकअपच्या फोटोंना लाईक्सही केले आहे.


आणखी एक धक्कादायक बातमी सांगायची झाल्यास, विकी व हरलीनच्या ब्रेकअपसाठी कॅटरिना कैफला कारणीभूत असल्याचे मानले जात आहे. होय, टाईम्स नाऊने दिलेल्या वृत्तानुसार, कॅटरिना कैफमुळे विकी आपल्याला धोका देत असल्याचे हरलीनला कळले आणि तिने म्हणे, ब्रेकअपचा निर्णय घेतला. आता या बातमीत किती सत्यता आहे, हे आम्हाला ठाऊक नाही. पण कॅटरिनामुळे विकी व हरलीनच्या आयुष्यात वादळ आल्याची चर्चा जोरात आहे.


काही दिवसांपूर्वी ‘कॉफी विद करण’ या शोमध्ये करण जोहर कॅटरिनावरून विकीची फिरकी घेताना दिसला होता. माझी जोडी विकी कौशलसोबत चांगली दिसेल, असे कॅटरिनाने म्हणाल्याचे करणने विकीला सांगितले होते. करण यातून विकीला काय सांगू इच्छित होता? यात काय ‘गोलमाल’ आहे? हे विकी आणि कॅटरिना हेच जाणोत.

Web Title: vicky kaushal breaks up with harleen sethi unfollows on instagram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.