Veteran actor Kader Khan, who suffered a stroke, went to the hospital | ज्येष्ठ अभिनेते कादर खान यांची तब्येत बिघडली,रूग्णालयात केले दाखल

आपल्या दमदार अभिनयाने आणि कॉमेडीने अभिनेता कादर खान यांनी रूपेरी पडदा गाजवला. कादर खान यांच्या विविध भूमिका मग त्या कॉमेडी असो किंवा मग व्हिलनच्या किंवा मग अन्य कोणतीही भूमिका ती आजही रसिकांच्या मनात घर करून आहे.आपल्या अभिनयाने रसिकांचे दिलखुलास मनोरंजन करणारे कादर खान गेल्या काही वर्षापासून गुडघेदुखीमुळे त्रस्त आहेत. हा कॉमेडी किंग मात्र आज कुठे आहे, काय करतोय याबाबत कुणालाही काहीही माहिती नाहीय.गेल्या काही वर्षापासून त्यांचा गुडघेदुखीचा त्रास आणखी बळावला आहे. जास्त हालचाल करणेही शक्य नसल्यामुळे ते व्हिलचेअरवरच असतात.नुकतेचे त्यांच्या गुडघ्यांचे ऑपरेशन करण्यात आले होते. मात्र हे ऑपरेशन चुकीच्या पद्धतीचे झाले असल्याचे समोर आलं. त्यामुळे हा त्रास असह्य झाल्याने ते आपल्या मुलाकडे कॅनडाला गेले होते. कादर खान यांना कॅनडातल्या  हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असल्याचे कळते आहे.2015 साली कादर खान यांची मीडिसमोर झलक पाहायला मिळाली होती.त्यांच्या आजारपणामुळेच ते गेले कित्येकवर्ष लाइमलाईटपासून लांब आहेत.गेल्याच वर्षी ते बाबा रामदेव यांच्या आश्रमात त्यांच्या गुडघेदुखीच्या इलाज करण्यासाठी गेले होते.तरीही त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही. दिवसेंदिवस त्यांचा गुडघे दुखीचा त्रास वाढत असल्यामुळे ऑपरेशन केल्यानंतरही त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्याचे कळते आहे.
Web Title: Veteran actor Kader Khan, who suffered a stroke, went to the hospital
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.