'Vedi Parineeti Chopra' behind this actress! | 'या' अभिनेत्याच्या मागे वेडी परिणीती चोप्रा !

परिणीती चोप्रा या अभिनेत्यासोबत काम करून इंडस्ट्रीत आपली ओळख बनवली होती ती पुन्हा एकदा सहा वर्षांनी त्याच्यासोबत स्क्रिन शेअर करणार आहे. परिणीती या अभिनेत्याच्या मागे वेडी आहे तसेच ती तिच्यासोबत भांडणसुद्धा करते.  2013 मध्ये आलेल्या इश्कजादे चित्रपटात दोघे एकत्र दिसले होते. 

परिणीती चोप्राची अर्जुन कपूरसोबत दुसरा चित्रपट रिलीज होणार आहे. दिबाकर बनर्जी यांच्या संदीप और पिंकी फरारमध्ये दोघे एकत्र दिसणार आहेत. अर्जुन कपूरबरोबर असलेल्या आपल्या मैत्रीच्या काही गोष्टी तिने शेअर केल्या आहेत. परिणीती म्हणाला की,  आम्ही दोघे इंडस्ट्रीत नवे होते मात्र आमच्यामध्ये चांगले बॉन्डिंग झाले होते. दोघांमधले नातं घट्ट होते. मस्करीच्या मूडमध्ये असलेल्या परिणीती असे सुद्धा म्हटले की अर्जुन खूप भाग्यवान आहे कारण त्याला माझ्यासारख्या अभिनेत्री बरोबर काम करायला मिळाले. पुढे ती अशी म्हणाली की मी कोणाच्या तोंडातून अर्जुन बद्दल अपशब्द सहन करु शकत नाही. परिणीती म्हणते की, ती अर्जुनसाठी कोणाशी ही भांडू सुद्धा शकते. 

या चित्रपटातीची गोष्ट एका कॉरपोरेटमध्ये काम करणाऱ्या मुलीची आहे. जो आपल्या ध्येयाला घेऊन खूप फोक्स्ड असते. अर्जुन कपूर पोलिस कर्मचाºयाच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट भारत विरूद्ध इंडियाच्या कल्पनेवर आधारित असल्याचे त्याने सांगितले होते. गेल्या काही काळात आपला देश भारत विरूद्ध इंडिया अशा वेगळ्यात गुंत्यात फसलेला दिसतोय. दोन वेगवेगळ्या विचारधारांचा संघर्ष देशात पाहायला मिळतो आहे. ‘संदीप और पिंकी फरार’ हा चित्रपट याच विचारधारेवर बेतलेला असेल. समाजातील बदल लोकांच्या आयुष्यात कशी उलथापालथ घडवू शकतात, हे या चित्रपटात दिसणार असल्याचे समजते आहे. 18 ऑगस्टला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. संदीप और पिंकी फरार’नंतर अर्जुन कपूर ‘नमस्ते कॅनडा’मध्ये दिसणार आहे.  

ALSO READ :  परिणीती चोप्राचे पॅचअप! एक्स-बॉयफ्रेन्डसोबत पुन्हा वाढल्या गाठीभेटी!!

Web Title: 'Vedi Parineeti Chopra' behind this actress!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.