ठळक मुद्देशाहिदवर नजर ठेवण्यासाठी वास्तविकता त्याच्या घराशेजारी राहायला आली होती असे देखील म्हटले जाते. मी तुझी फॅन आहे असे सांगत ती अनेकवेळा त्याला अडवत असे. या सगळ्या गोष्टीमुळे शाहिद खूपच कंटाळला होती. त्याने तिच्याविरोधात पोलिसांकडे तक्रार देखील केली होती.

शाहिद कपूरने इश्क विश्क या चित्रपटाद्वारे त्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्याच्या पहिल्याच चित्रपटातील भूमिकेचे प्रचंड कौतुक झाले होते. या चित्रपटामुळे त्याला चांगलेच फॅन फॉलॉव्हिंग मिळाले. त्याच्या फॅन्समध्ये देखील महिला चाहत्यांची संख्या ही अधिक आहे. शाहिदने आज बॉलिवूडमध्ये त्याचे एक प्रस्थ निर्माण केले आहे. त्याची एक झलक पाहायला मिळावी यासाठी त्याचे चाहते कित्येक तास त्याच्या घराबाहेर उभे असतात. पण तुम्हाला माहीत आहे का, केवळ सामान्य मुलीच नव्हे तर बॉलिवूडमधील अभिनेत्री देखील शाहिदच्या फॅन बनल्या आहेत. बॉलिवूडमधील एक अभिनेत्री तर त्याच्या प्रेमात इतकी वेडी झाली होती की, कंटाळून तिच्या विरोधात शाहिदला पोलिसांकडे तक्रार करावी लागली होती.

शाहिदच्या मागे लागलेली अभिनेत्री ही एका प्रसिद्ध अभिनेत्याची मुलगी होती. अभिनेता राज कुमार यांनी बॉलिवूडला अनेक हिट चित्रपट दिले. त्यांच्या सगळ्याच भूमिकांचे प्रेक्षकांनी कौतुक केले. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांचा मुलगा पुरू राज कुमार आणि मुलगी वास्तविकता पंडित यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. पण त्यांना या क्षेत्रत आपले प्रस्थ निर्माण करता आले नाही. वास्तविकताचे कोणतेच चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट झाले नाहीत. त्यामुळे मीडियामध्ये तिच्या नावाची कधीच चर्चा झाली नाही. पण एका वेगळ्याच कारणामुळे वास्तविकता प्रसिद्धीझोतात आली होती. वास्तविकता शाहिद कपूरच्या प्रेमात पडली होती आणि काहीही करून त्याच्याशीच लग्न करायचे असे तिने ठरवले होते आणि त्यासाठी ती शाहिद जिथे जाईल तिथे त्याचा पाठलाग करत असे. 

शाहिदवर नजर ठेवण्यासाठी वास्तविकता त्याच्या घराशेजारी राहायला आली होती असे देखील म्हटले जाते. मी तुझी फॅन आहे असे सांगत ती अनेकवेळा त्याला अडवत असे. या सगळ्या गोष्टीमुळे शाहिद खूपच कंटाळला होती. त्याने तिच्याविरोधात पोलिसांकडे तक्रार देखील केली होती. या नंतर हे प्रकरण शांत झाले. 

वास्तविकता आज बॉलिवूडपासून दूर असून गेल्या काही वर्षांपासून ती कुठे आहे याबाबत मीडियाला देखील माहीत नाहीये.


Web Title: Vastavikta Pandit Famous As A Shahid Kapoor Stalker
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.