Varun Dhawan's 'Jovan 2' audience visit only on Dussehra | दसऱ्याच्या मुहुर्तावर फक्त वरुण धवनचा 'जुडवा २' प्रेक्षकांच्या भेटीला

दसऱ्याच्या मुहुर्तावर यावेळेस वरूण धवनच्या 'जुडवा२' बरोबर कोणताच चित्रपट रिलीज होत नाही आहे. त्यामुळे हा दसरा वरुणसाठी खरचं लाभदायी ठरणार आहे. दरवर्षी दसऱ्याच्या मुहुर्तावर अनेक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतात. पण 'जुडवा २' ची लोकप्रियता पहाता बाकी लोकांनी आपला चित्रपटाच्या रिलीज डेट पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. कारण अनेक निर्मात्यांना माहीत आहे की हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर नक्कीच धमाल उडवून देणार आहे. 

गेल्या वर्षा दसऱ्याला एम. एस. धोनी द अनटोल्ड स्टोरी चित्रपट  रिलीज झाला होता. त्याच्या आधीच्या दसऱ्याला सिंग इस ब्लिग आणि तलवार सारखे चित्रपट प्रदर्शित झाले होते. ते बघता हा दसरा असाच मोकळा आहे. त्यात हसीना पारकर आणि संजय दत्तचा भूमी चित्रपटाने ठाण मांडले आहे पण त्या चित्रपटांना बॉक्स ऑफिसवर म्हणावी तशी कमाई करता आलेली नाही. एकदा 'जुडवा २' रिलीज झाला की या सगळ्यांची भरपाई हा एकच चित्रपट करेल.  येत्या ६ऑक्टोबरला सैफ आली खानचा चित्रपट 'शेफ' चित्रपट रिलीज होत आहे हा एकच चित्रपट वरून धवन च्या जुडवा २ ला टक्कर देऊ शकतो.
 
डेव्हिड धवन यांनी १९९७ साली सलमान खानला घेऊन जुडवा तयार केला होता आणि हा चित्रपट हिटदेखील झाला होता.  आता त्याचा  सिक्वेल घेऊन वरुण धवन येतो आहे. यात करिश्मा कपूरच्या जागा जॅकलिन फेर्नांडिस ने घेतली आहे तर रंभाची जागा तापसी पन्नू घेतली आहे. साजिद नाडीयाडवाला या चित्रपटाची निर्मिती करतो आहे. . तब्बल 20 वर्षांनंतर या चित्रपटाचा सीक्वल येतो आहे. वरुणचे चाहते त्याला सलमानने साकारलेल्या भूमिकेत बघण्यासाठी खूप उत्सुक आहेत. सलमानचा ही या चित्रपटात कॅमिओ आहे. वरुण धवनची या चित्रपटात दुहेरी भूमिका आहे. याआधी वरुणने वडिलांसोबत 'मै तेरा हिरो' चित्रपटात काम केले आहे. या चित्रपटासाठी वरुण हा परफेक्ट चॉईज असल्याचे सलमान म्हणाला. 

ALSO READ : ​'जुडवा 2' सिनेमासाठी दोन गुप्तहेरांची घ्यावी लागली मदत?जाणून घ्या काय घडले होते

Web Title: Varun Dhawan's 'Jovan 2' audience visit only on Dussehra
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.