जर तुम्ही वरुण धवनसारख्या हॅण्डसम हंक अभिनेत्याचे चाहते असाल तर तुम्हाला नक्कीच त्याच्या फिटनेस रूटीनबद्दल जाणून घेण्यास आवडेल. वरुण बॉलिवूडमध्ये आल्यानंतर नव्हे तर शालेय जीवनापासून आपल्या फिटनेसप्रती अलर्ट आहे. कारण शालेय जीवनापासून तोच एक खेळाडू म्हणून राहिला आहे. त्यामुळे तो नेहमीच त्याचा स्टॅमिना वाढविण्यासाठी हार्ड वर्कआउट करणे पसंत करतो. स्विमिंग व्यतिरिक्त तो स्पोर्ट्समध्येही इन्व्हॉल्व आहे. एका मुलाखतीत त्याने सांगितले होते की, ‘आजही मी नियमितपणे स्विमिंग करतो. भलेही १५ मिनिटेच करतो पण न चुकता स्विमिंग करतो. याव्यतिरिक्त मला क्रिकेट खेळणेही आवडते. वरुण वर्कआउटच्या अगोदर १० ते १५ मिनिटे वार्मअप करण्यास कधीच विसरत नाही. जॉगिंग, जम्पिंग, रनिंग आणि चेस्ट शोल्डर्सचे तो स्ट्रेचिंग करतो. दुखापतीची तो कधीच भीती बाळगत नाही. फिटनेस ट्रेनर प्रशांत सावंत वरुणकडून आठवड्यातून पाच दिवस तब्बल ९० मिनिटे वर्कआउट करून घेत असतो. मार्शल आर्टपासून ते वेट लिफ्टिंग तो करून घेत असतो. यामुळे बॉडी लवचीक आणि कठीण बनते. जेव्हा वेळ मिळतो तेव्हा वरुण योगा करण्यासही प्राधान्य देतो. वरुण म्हणतो की, वर्कआउट नियमित करण्यासाठी स्वत:च स्वत:ला प्रोत्साहित करणे गरजेचे आहे. माझे हे काम ट्रेनर प्रशांत खूपच चांगल्या पद्धतीने करतो. जेव्हा माझे वर्कआउट करण्यास मन नसते तेव्हा प्रशांत मला काही जुने फोटोज् दाखवितो. ते फोटो बघून मी लगेचच वर्कआउट करण्यास सुरुवात करतो. वरुणच्या मते, नेहमीच आपल्या बॉडीचे ऐकायला हवे. जर तुम्ही असे केले नाही तर स्वत:ला दुखापतग्रस्त करून घ्याल. वरुण आपल्या डायटवरही विशेष लक्ष देऊन असतो. जास्त मीठ, साखर किंवा तेलकट पदार्थांपासून तो नेहमीच स्वत:चा बचाव करतो. फ्रुट्स आणि नॉनव्हेजही त्याच्या आहारात असते. 
Web Title: This is Varun Dhawan's fitness secret; You can follow it!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.