वरुण धवनचा हा सिनेमा असणार 'मिशन इंम्पॉसिबल'वर आधारीत

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2018 07:43 PM2018-10-30T19:43:05+5:302018-10-30T19:44:09+5:30

अभिनेता वरूण धवनचा आगामी चित्रपट 'रणभूमी'चे काम सध्या जोरात सुरू आहे.

 Varun Dhawan's film will be based on 'Mission Impossible' | वरुण धवनचा हा सिनेमा असणार 'मिशन इंम्पॉसिबल'वर आधारीत

वरुण धवनचा हा सिनेमा असणार 'मिशन इंम्पॉसिबल'वर आधारीत

googlenewsNext
ठळक मुद्दे'रणभूमी' सिनेमा 'मिशन इंम्पॉसिबल'वर आधारित

अभिनेता वरूण धवनचा आगामी चित्रपट 'रणभूमी'चे काम सध्या जोरात सुरू आहे. या चित्रपटाची निर्मिती करण जोहर व दिग्दर्शन शशांक खेतान करतो आहे. हा चित्रपट नावाप्रमाणे अॅक्शनपॅक्ड असणार आहे. हा सिनेमा टॉम क्रूझच्या गाजलेल्या 'मिशन इंम्पॉसिबल'वर आधारित असणार आहे.
वरुण धवनच्या “शुद्धी’मध्येच फेरफार करून “रणभूमी’बनवला जात आहे, असे पूर्वी ऐकायला मिळाले होते. करण जोहरच्याच निर्मितीखाली 'शुद्धी'चे काम होणार होते. मात्र प्रारंभापूर्वीच हा सिनेमा रखडला होता. 

वरुण धवनला पहिल्यांदाच पूर्णपणे अॅक्‍शन हिरोचा रोल करायचा आहे. यापूर्वी 'जुडवा २' आणि अन्य काही सिनेमांमध्ये वरुण धवनने अॅक्‍शन सीन जबरदस्त केले होते. वरूणने शशांक खेतानसोबत 'हम्प्टी शर्मा की दुल्हनियां' व 'बद्रीनाथ की दुल्हनियां'मध्ये काम केलेले आहे. हे दोन्ही सिनेमे बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरले आहेत. आता शशांक खेतानसोबत वरूण 'रणभूमी' सिनेमात काम करणार आहे. हा सिनेमा हॉलिवूडच्या स्तरावर बनवला जाणार आहे.  रणभूमीतील अॅक्‍शन सीनचे शूटिंग भारताबरोबर विदेशातही केले जाणार आहे. यामध्ये वरुणच्या बरोबरीने जान्हवी कपूर असणार आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळते आहे. 'रणभूमी'च्या चित्रीकरणाला पुढील वर्षी सुरूवात होईल आणि २०२०पर्यंत हा चित्रपट प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.
तसेच वरूण धवन 'कुली नं १' सिनेमाच्या रिमेकमध्ये गोविंदाच्या जागी वरूण धवन दिसणार आहे. या सिनेमाच्या कामाला लवकरच सुरूवात होणार असून चित्रपटाची नायिकाही लवकर फायनल करण्यात येणार आहे. 'कुली नं.१' चित्रपट १९९५ मध्ये प्रदर्शित झाला होता. यातील गाणे हिट ठरले होते आणि चित्रपटाला प्रेक्षकांचाही प्रतिसाद मिळाला होता. यामुळेच याचा रिमेक बनविण्यात येत आहे.

Web Title:  Varun Dhawan's film will be based on 'Mission Impossible'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.