Varun Dhawan's car accident | वरुण धवनच्या कारचा अपघात

अभिनेता वरुण धवनच्या कारचा मुंबईत अपघात झाला आहे. यात त्याची कार क्षतीग्रस्त झाली असली तरी यात कुणीच जखमी झाले नाही असे वरुण धवनने ट्विट करून सांगितले. 

वरुण धवनच्या कारचा अपघात झाल्याची माहिती ट्विटरवर एका व्यक्तीने पोस्ट केली. त्याने आपल्या पोस्टमध्ये ‘वरुण धवनची होंडा सिटी कार जुहू येथील 10 व्या रोडवर क्षतीग्रस्त झाली आहे’ असे ट्विट केले. यावर फार वेळ न लावता, वरुणने आपली बाजू मांडली. त्याने ट्विट करीत याचा खुलासा केला.
 

The car that is damaged is my car. I had come to help someone in my family who had an accident.i suggest you shutup https://t.co/Vrhx7sZl1t

— Varun dhawan (@Varun_dvn) October 9, 2016

दुर्घटना ग्रस्त झालेली कार माझीच असून मी माझ्या कुुटुंबातील जखमींची मदत करण्यासाठी आलो होतो, तुम्ही चूप रहा असा सल्ला मी तुम्हाला देत आहे. माझ्या कुुटुंबातील सर्व सदस्य सुखरूप असून यात कुणीच जखमी झाले नाही. धन्यवाद. 

मात्र त्याने या दोन्ही पोस्ट आपल्या ट्विटर अकाऊंटवरून काढून घेतल्या आहेत. हे विशेष. 
 
 
वरुण धवनच्या कारच्या अपघाताची बातमी सोशल मीडियावर पोस्ट झाल्याने दिवसभर याची चर्चा सुरू होती. वरुण सध्या ‘ब्रदिनाथ की दुल्हनीया’ या चित्रपटाची शूटिंग करीत आहे. सलमान खान यांची दुहेरी भूमिका असलेल्या ‘जुडवा’ या चित्रपटाचा सिक्वल ‘जुडवा 2’मध्ये तो दिसेल. 
Web Title: Varun Dhawan's car accident
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.