Varun Dhawan will appear in the sequel of Salman Khan's super hit film | सलमान खानच्या सुपरहिट चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये दिसणार वरुण धवन

साजिद नाडीयादवालाने २०१४ मध्ये चित्रपट किकच्या माध्यमातून दिग्दर्शक म्हणून पदार्पण केले आणि हा चित्रपट त्या वर्षातील सगळ्यात हिट चित्रपट ठरला. त्यानंतर या चित्रपटाचा लवकरच सिक्वेल येणार असल्याची सगळीकडे चर्चा झाली. पण किकच्या मेकर्सने या बातमीवर काही प्रतिक्रिया दिली नाही. पण आता असे समजते आहे की नाडीयादवाला प्रॉडक्शन हाऊस 'किक २' च्या तयारीला लागले आहे. मिळालेल्या माहितीनुसार यात सलमान खानबरोबर वरुण धवनसुध्दा दिसणार आहे.

विश्वास नाही बसत ना पण ही बातमी खरी आहे. मिड- डेच्या रिपोर्टनुसार 'जुडवा २'च्या एका सीनमध्ये सलमान खान आणि वरूण धवन पहिल्यांदाच एकत्र दिसले होते आणि त्यांची ही केमिस्ट्री प्रेक्षकांच्या पसंतीस पडली. प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया लक्षात घेऊन साजिदने या दोघांना एकत्र घेऊन चित्रपट तयार करण्याचा विचार करतो आहे.
'किक २' ला घेऊन या चित्रपटाचे मेकर्स फारच उत्सुक आहे आहेत. कारण ह्यात सलमान खान आणि वरुण धवन दोघे पहिल्यांदा एकत्र काम करणार आहे. साजिद नाडीयादवालाने 'किक २' बद्दल दोघांशी बोलणी सुद्धा सुरु केली आहे आणि दोघांनीही सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे. सूत्रानुसार  साजिदची टीम सध्या 'किक २' स्क्रिप्टवर काम करत आहे. जशी स्क्रिप्ट फायनल होईल तशी ती दोन्ही अभिनेत्यांना दिली जाईल. 

ALSO READ :  सलमान खानच्या जुडवामध्ये आणि वरुण धवनच्या जुडवा 2 मध्ये या गोष्टी आहेत सेम टू सेम

वरुण धवनच्या जुडवा २ ने बॉक्स ऑफिसवर 100 कोटींचा आकडा पार केला आहे. यात वरुणसह जॅकलिन फर्नांडिस आणि तापसी पन्नू सुद्धा दिसल्या होत्या. तर सलमान खानने नुकतेच त्याचा आगामी चित्रपट टायगर जिंदा है चे शूटिंग पूर्ण केले आहे. यात त्याच्यासोबत कॅटरिना कैफ दिसणार आहे. तब्बल 5 वर्षानंतर सलमान आणि कॅटरिनाची केमिस्ट्री बघण्यासाठी प्रेक्षक नक्कीच आतुरत असतील.  हा एक था टायगरचा सीक्वल आहे. ख्रिसमच्या मुहुर्तावर सलमानचा हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सलमान आणि कॅटरिना दोघांचे आधीचे चित्रपट फ्लॉप गेल्यामुळे दोघांना त्याच्या या चित्रपटाकडून खूप अपेक्षा आहेत. 
 
Web Title: Varun Dhawan will appear in the sequel of Salman Khan's super hit film
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.