Varun Dhawan melts in sweat for 'stigma'; Photo shared on social media! | ‘कलंक’साठी वरूण धवन गाळतोय घाम; सोशल मीडियावर शेअर केला फोटो !

बॉलिवूडचा चॉकलेट बॉय अभिनेता वरूण धवन हा सध्या त्याचा आगामी चित्रपट ‘कलंक’ साठी प्रचंड उत्सुक आहे. केवळ स्क्रिप्टवरच नव्हे तर तो त्याच्या वजनावरही लक्ष देताना दिसतोय. अलीकडेच त्याने जिममध्ये वर्कआऊट करतानाचा त्याचा फोटो सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर केला आहे. या फोटोत तो अगदी स्लिम फिट, त्याचे टोन्ड बायसेप्स, एट पॅक्स अ‍ॅब्स दाखवतो आहे. त्याचा हा शर्टलेस फोटो सोशल मीडियावर कमालीचे लाइक्स मिळवत आहे. तो त्याच्या या टोन्ड बॉडीसाठी स्ट्रिक्ट डाएट घेताना दिसतो आहे. सेटवर देखील तो जिममध्ये दिवसांचे अधिकाधिक तास घालवतो आहे.करण जोहर , साजिद नाडियाडवाला आणि अपूर्व मेहता निर्मित बिगबजेट चित्रपट ‘कलंक’ अभिषेक बर्मन दिग्दर्शित करणार आहेत. या मेगास्टारर चिपटात माधुरी व संजयशिवाय सोनाक्षी सिन्हा, आलिया भट्ट, वरूण धवन आणि आदित्य राय कपूर यांची वर्णी लागली आहे. पुढील वर्षी १९ एप्रिलला हा चित्रपट रिलीज होणार असल्याचे कळतेय. तब्बल २१ वर्षांनंतर संजय दत्त आणि माधुरी दीक्षित पुन्हा एकदा एका चित्रपटात दिसणार आहेत. अधिक माहिती अशी आहे की, संजय दत्तने ‘कलंक’ चित्रपटात काम करण्यासाठी एकच अट ठेवली आहे की, तो माधुरीसोबत चित्रपटात एकाही सीनमध्ये एकत्र शूटिंग करणार नाही. आलिया भट्ट आणि वरूण धवन हे चौथ्यांदा करण जोहरच्या चित्रपटासाठी एकत्र आले आहेत. मागच्या आठवड्यातच चित्रपटाची शूटिंग सुरू झाली असून चित्रपटाच्या बाबतीतील कोणतीही गोष्ट बाहेर लीक करण्यात येत नाहीये. 

‘कलंक’ हा चित्रपट करण जोहरचा ड्रिम प्रोजेक्ट असून त्यांचे वडील यश जोहर यांना या कथानकावर आधारित चित्रपट बनवायचा होता. त्यामुळे करण जोहर या चित्रपटासाठी विशेष उत्सुक असल्याचे दिसूल आले आहे. त्याने या चित्रपटाच्या शूटिंगसाठी १५ कोटींचा सेट तयार केला आहे. सुत्रांनुसार, मुंबईतल्या गोरेगावमध्ये फिल्म सिटीमध्ये एक भव्यदिव्य सेट तयार करण्यात आला आहे. ज्याच्या बाहेर चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. याला कारण सेटचे फोटो लीक होऊ नये म्हणून बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.  करणने जुन्या दिल्लीचा सेट उभारण्यासाठी १५ कोटींचा खर्च केला आहे. करणने सेटचे डिझाइन आणि स्ट्रक्चर बनवण्यासाठी प्रॉडक्शन डिझायनर अमृता महलची मदत घेतली आहे. 
Web Title: Varun Dhawan melts in sweat for 'stigma'; Photo shared on social media!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.