‘अक्टूबर’ आणि ‘सुईधागा’ सिनेमानंतर वरुण धवन ‘कलंक’ सिनेमातून रसिकांच्या भेटीला येत आहे. वरुण धवन आपल्या प्रत्येक चित्रपटामध्ये पात्रावर खूप मेहनत घेतो. 'कलंक' साठीदेखील तो अशीच मेहनत घेत असल्याचे पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी सोशल अकाऊंटवर एक क्रेजी व्हिडिओ शेअर केला होता. यात तो धावत्या ट्रेडमिलवर डंबल ठेवून एक्सरसाईज करताना  पाहायला मिळाला होता. त्याचे एक्सरसाईज व्हिडीओहीलाही त्याच्या चाहत्यांकडून भरघोस पसंती मिळत आहे. या सिनेमात वरुण लोहारची भूमिका साकारणार आहे. त्याचे दुकान लाहौर मार्केटमध्ये आहे. ते हिरा मंडीच्या नावावने प्रसिद्ध असते. वरुणच्या पात्रानुसार त्याचा फिटनेस प्रशिक्षक प्रशांत सावंत त्याच्याकडून कठीण वर्कआउट करून घेत आहे. सध्या वरूणचे हे वर्कआऊट करत असल्याचे फोटोही सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 


प्रशांतने सांगितले...., 'वरुण लोहाराची भूमिका करत असल्याचे मला सांगण्यात आले होते. त्याचा गल्लीच्या मुलाप्रमाणे लूक करण्याचे सांगण्यात आले हाेते. लोहाराचे शारीरिक काम जास्त असते त्यामुळे आम्ही त्याचे वजन वाढवले. शिवाय वरुणनेदेखील व्यायाम करून स्नायू आणखीन बळकट केले. मी त्याच्यासाठी खाण्या-पिण्याची वेळ ठरवली होती. त्यामुळे स्नायू लवकर वाढले. खरं तर, वरुणचे शरीर आधीच शेपमध्ये होते फक्त त्याला थोडे जाड दिसायचे होते.


त्यामुळे आम्ही त्याच्या छाती, कमर आणि दंडावर जास्त मेहनत घेतली. आता तो थाेडा जाड दिसतो आहे. प्रशांतने पुढे सांगितले..., 'वरुणसोबत मी रोज ४५ मिनिट ते १ तास असतो, या वेळेत त्याच्याकडून अनेक कसरती करून घेतो. आम्ही २० मिनिट कार्डिओ वर्कआऊट करतो. एक दिवस शरीराच्या विविध भागाचा व्यायाम करतो. ज्याप्रमाणे छाती आणि कमरेवर जास्त लक्ष देतो.

वजन वाढवण्याबरोबरच आम्ही त्याच्या एब्सवर जास्त लक्ष देत होतो. याबरोबरच आम्ही त्याच्या खाण्यापिण्याकडे विशेष लक्ष दिले. त्याच्या जेवणात प्रथिने आणि कर्बोदकांमध्ये वाढ केली. न्याहारीत तो अंडी आणि ओट्स खातो. दुपारी सँडविच, ब्राउन राइस खातो. संध्याकाळी अंडी.


Web Title: Varun Dhawan gets bruised during Kalank shoot, proudly flaunts his scars in Instagram photo
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.