वरूण धवन बनला ‘चाचू नंबर1’; पाहा, सरप्राईज फोटो!!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2018 01:09 PM2018-07-11T13:09:50+5:302018-07-11T13:13:05+5:30

होय, गत ३१ मे रोजी  रोहित धवनची पत्नी जान्हवीने एका सुंदर मुलीला जन्म दिला होता. म्हणजेच, वरूण काका बनला होता.

  Varun Dhawan becomes 'Chachu No.1'; first glimpse varun dhawans niece | वरूण धवन बनला ‘चाचू नंबर1’; पाहा, सरप्राईज फोटो!!

वरूण धवन बनला ‘चाचू नंबर1’; पाहा, सरप्राईज फोटो!!

googlenewsNext

काही दिवसांपूर्वीचं वरूण धवनच्या फॅमिलीत एका तान्हुलीचे आगमन झाले. होय, गत ३१ मे रोजी  रोहित धवनची पत्नी जान्हवीने एका सुंदर मुलीला जन्म दिला होता. म्हणजेच, वरूण काका बनला होता. वरूणने स्वत: ही बातमी चाहत्यांसोबत शेअर केली होती. तेव्हापासून धवन फॅमिलीत सेलिब्रेशन सुरु आहे. काही तासांपूर्वी धवनने आपल्या पुतणीची पहिली झलक सोशल मीडियावर शेअर केली. 

या फोटोत अख्खी धवन फॅमिली एकत्र दिसतेय. वरूण, त्याचे मॉम, डॅड, भाऊ, वहिणी आणि छोटीशी तान्हुली असे सगळे या फ्रेममध्ये आहेत. विशेष म्हणजे, या सगळ्यांनी एकसारखी टी-शर्ट परिधान केली आहे. वरूणच्या टी-शर्टवर ‘चाचू नंबर1’ लिहिले आहे तर डेव्हिड धवन यांच्या टी-शर्टवर ‘दादू नंबर1’ लिहिले आहे. ‘लव्ह अ‍ॅट फर्स्ट सार्ईट’ या कॅप्शनसह वरूणने हा सुंदर फोटो पोस्ट केला आहे.
तुम्हाला ठाऊक असेलच की, वरूणचा भाऊ रोहित हा सुद्धा फिल्म इंडस्ट्रीशी संबंधित आहे. एक दिग्दर्शक म्हणून त्याने आपली स्वत:ची खास ओळख निर्माण केली आहे. ‘ढिशूम’ आणि ‘देसी ब्यॉयज’ सारखे चित्रपट त्याने दिग्दर्शित केले आहेत. तूर्तास वरूण धवल ‘कलंक’ या चित्रपटात बिझी आहे. यात तो पुन्हा एकदा आलिया भट्टसोबत दिसणार आहे. याशिवाय ‘रणभूमी’ आणि ‘सुई धागा’ या चित्रपटातही तो दिसणार आहे.

 

Web Title:   Varun Dhawan becomes 'Chachu No.1'; first glimpse varun dhawans niece

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.