Varun Dhawan and Katrina Kaifchi hot chemistry will appear in the remo movie This is proof !! | ​रेमोच्या चित्रपटात दिसणार वरूण धवन व कॅटरिना कैफची हॉट केमिस्ट्री! हा आहे पुरावा!!

वरूण धवनच्या आत्तापर्यंतच्या करिअरमध्ये एकही चित्रपट फ्लॉप गेला नाही. गोविंदा आणि सलमान खान यांचे अजब ‘मिश्रण’ म्हणून वरूण धवनकडे पाहिले जाते. अलीकडे सलमान खानच्या ‘जुडवा’चा सीक्वल वरूणने हिट करून दाखवला. वरूणने सलमानकडून ‘जुडवा’ बळकावला, असे यानंतर म्हटले गेले होते. इतके कमी की काय म्हणून आता सलमानची सगळ्यात आवडती हिरोईन कॅटरिना कैफ हिलाही वरूणने त्याच्याकडून हिसकावले आहे. होय, लवकरच वरूण कॅटरिनासोबत आॅनस्क्रीन रोमान्स करताना दिसणार आहे. वरूण व कॅटची ही जोडी आत्तापर्यंतचा सर्वात मोठा डान्सिंग सिनेमा   घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. दिग्दर्शक व कोरिओग्राफर रेमो डिसूजा याने आज या चित्रपटाचा टीजर  रिलीज केला. अर्थात या चित्रपटाचे अधिकृत नाव अद्याप जाहिर करण्यात आले नाही. पण हा चित्रपट ‘एबीसीडी3’ म्हणजेच रेमोच्या ‘एबीसीडी’ सीरिजचा तिसरा भाग असल्याचे मानले जात आहे.  रेमो डिसूजा दिग्दर्शित या आगामी चित्रपटात प्रभु देवा सुद्धा महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे.ALSO READ : वरुण धवनच्या 'अक्टूबर' चित्रपटाचा ट्रेलर आऊट

 आज या चित्रपटाचा टीजर जारी करताना हा आत्तापर्यंतचा सर्वात मोठा डान्स चित्रपट असेल, असा दावा करण्यात आला आहे. हा ३ डी चित्रपट पुढील वर्षी नोव्हेंबरमध्ये रिलीज होईल. ‘एबीसीडी3’ हा ‘एबीसीडी’ सीरिजचा तिसरा सिनेमा असेल, असे तूर्तास सांगितले जात आहे. या सीरिजमधील साआधीचे दोन्ही सिनेमे रेमो डिसूजा यानेच दिग्दर्शित केले होते. २०१३ मध्ये ‘डान्स इंडिया डान्स’ या रिअ‍ॅलिटी शोमधील डान्सरला घेऊन रेमोने ‘एबीसीडी’ (एनीबडी कॅन डान्स) बनवला होता. २०१५ मध्ये रेमो ‘एबीसीडी2’ घेऊन आला होता. या चित्रपटात वरूण धवन आणि श्रद्धा कपूर लीड रोलमध्ये होते. आता रेमो ‘एबीसीडी3’ घेऊन येतो आहे. बड्या स्टारकास्टसोबतच ३ डी चित्रपट असल्याने याचे बजेटही मोठे असणार आहे.रेमोच्या या डान्स मुव्हीत आणखी काय काय एक्ससाईटींग पाहायला मिळते, ते बघूच.
Web Title: Varun Dhawan and Katrina Kaifchi hot chemistry will appear in the remo movie This is proof !!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.