Varun Dhawan and Alia Bhatt's film Kalank song Ghar More Pardesiya out | Kalank song Ghar More Pardesiya: जफर-रूपचे सच्चे प्रेम अन् आलिया-माधुरीची जुगलबंदी!!
Kalank song Ghar More Pardesiya: जफर-रूपचे सच्चे प्रेम अन् आलिया-माधुरीची जुगलबंदी!!

ठळक मुद्देअद्याप ‘कलंक’च्या कथेबद्दल फार खुलासा झालेला नाही. पण चर्चा खरी मानाल तर हा चित्रपट हिंदू- मुस्लिम वादावर आधारित आहे.

धर्मा प्रॉडक्शनचा बहुप्रतिक्षीत चित्रपट ‘कलंक’चे पहिले बहुप्रतिक्षीत गाणे ‘घर मोरे परदेशिया’ रिलीज झालेय. काल या गाण्याचा टीजर रिलीज झाला होता. हा टीजर पाहून वरूण धवन आणि आलिया भटच्या चाहत्यांना कधी एकदा हे गाणे रिलीज होते, असे झाले होते. काही क्षणांपूर्वी धर्मा प्रॉडक्शनने या गाण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आणि चाहत्यांच्या त्यावर उड्या पडल्या.
या गाण्यात वरूण आणि आलियाने साकारलेल्या जफर आणि रूपच्या ख-या प्रेमाची झलक मनात घर करते, तशीच आलिया व माधुरी दीक्षित या दोघींची जुगलबंदी मन जिंकते. आलियाचे सुंदर ‘रूप’ तर इतके भुलवते की, तिच्यावरून एक क्षणही नजर हलत नाही. कथ्थक करतानाच्या तिच्या अदा मोहित करतात.


 अद्याप ‘कलंक’च्या कथेबद्दल फार खुलासा झालेला नाही. पण चर्चा खरी मानाल तर हा चित्रपट हिंदू- मुस्लिम वादावर आधारित आहे. ८० कोटी रूपये खर्चून बनवलेला हा चित्रपट अगदी शूटींग सुरु झाल्यापासून चर्चेत आहे. ४० च्या दशकाची कथा असलेल्या या चित्रपटात वरूण धवन, आलिया भट्ट, संजय दत्त, माधुरी दीक्षित, सोनाक्षी सिन्हा, आदित्य राय कपूर असे दमदार कलाकार आहेत. साहजिकचं या चित्रपटाकडून करणला प्रचंड अपेक्षा आहेत. चित्रपटाला भव्यदिव्य बनवण्यात करण कुठलीही कसर सोडलेली नाही. त्यामुळे रिलीजच्या एक महिन्यापूर्वीच या चित्रपटाचे अ‍ॅडव्हान्स बुकिंग सुरु झाले आहे.   जाणकारांच्या मते, हा चित्रपट आलिया व वरूणच्या करिअरमधील हायेस्ट ओपनिंग ग्रॉसर ठरू शकतो. येत्या १७ एप्रिलला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येतोय.

English summary :
Dharma Productions's much anticipated movie kalank's song 'Ghar More Pardesia' has been released for the first time. Yesterday (17-03-2019) the song teaser was released. Varun Dhawan, Alia Bhatt, Sanjay Dutt, Madhuri Dixit, Sonakshi Sinha and Aditya Rai Kapoor worked in this movie. On April 17 film will be released.


Web Title: Varun Dhawan and Alia Bhatt's film Kalank song Ghar More Pardesiya out
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.