सुरु झाली ‘स्टुडंट ऑफ द ईअर 3’ची तयारी! स्टुडंटही फायनल!!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2019 02:30 PM2019-04-11T14:30:13+5:302019-04-11T15:23:36+5:30

‘स्टुडंट ऑफ द ईअर 2’च्या ट्रेलरची प्रतीक्षा करणाऱ्या चाहत्यांसाठी एक गोड बातमी आहे. ‘स्टुडंट ऑफ द ईअर 2’ प्रदर्शित होण्याआधीच करण जोहरने ‘स्टुडंट ऑफ द ईअर 3’ची तयारी सुरु केली आहे. खास म्हणजे, या चित्रपटाची लीड कास्टही ठरलीय.

varun dhawan and alia bhatt lock for karan johars student of the year 3 | सुरु झाली ‘स्टुडंट ऑफ द ईअर 3’ची तयारी! स्टुडंटही फायनल!!

सुरु झाली ‘स्टुडंट ऑफ द ईअर 3’ची तयारी! स्टुडंटही फायनल!!

googlenewsNext
ठळक मुद्दे‘स्टुडंट ऑफ द ईअर’ या चित्रपटातून आलिया व वरूणने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. याचा सीक्वल ‘स्टुडंट ऑफ द ईअर 2’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतोय.

‘स्टुडंट ऑफ द ईअर 2’च्या ट्रेलरची प्रतीक्षा करणाऱ्या चाहत्यांसाठी एक गोड बातमी आहे. ‘स्टुडंट ऑफ द ईअर 2’ प्रदर्शित होण्याआधीच करण जोहरने ‘स्टुडंट ऑफ द ईअर 3’ची तयारी सुरु केली आहे. खास म्हणजे, या चित्रपटाची लीड कास्टही ठरलीय. होय, ‘स्टुडंट ऑफ द ईअर 2’ या चित्रपटात पुन्हा एकदा वरूण धवन आणि आलिया भट ही लोकप्रिय जोडी चाहत्यांचे मनोरंजन करताना दिसणार आहे.

खुद्द वरूण आणि आलियाने अलीकडे याबाबतचे संकेत दिलेत. ‘इतक्या लवकर आमच्या पहिल्या चित्रपटाचा सीक्वल येईल, अशी कल्पनाही आम्ही केली नव्हती. आजही लोक आम्हाला ‘स्टुडंट’ म्हणून बोलवतात. हा टॅग आम्ही कायम मिरवत राहू आणि कुणाला ठाऊक ‘स्टुडंट ऑफ द ईअर 3’मध्ये आम्ही पुन्हा ‘स्टुडंट’ बनून परतू,’असे आलिया व वरूण म्हणाले. त्यांच्या या बोलण्यावरून ‘स्टुडंट आॅफ द ईअर 3’ येणार आणि निश्चित येणार, हे नव्याने सांगण्याची गरज नाही.

‘स्टुडंट ऑफ द ईअर’ या चित्रपटातून आलिया व वरूणने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. याचा सीक्वल ‘स्टुडंट ऑफ द ईअर 2’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. टायगर श्रॉफ, अनन्या पांडे आणि तारा सुतारिया यात लीड रोलमध्ये आहेत. उद्या शुक्रवारी ‘स्टुडंट ऑफ द ईअर 2’चा ट्रेलर प्रदर्शित होतोय. साहजिकच चाहते उत्साहित आहेत. अशात ‘स्टुडंट ऑफ द ईअर 3’ची तयारी सुरु झाल्याची बातमी चाहत्यांचा उत्साह द्विगुणित करणारी आहे. वरूण व आलिया सध्या ‘कलंक’ या चित्रपटात बिझी आहे. येत्या १७ एप्रिलला हा चित्रपट प्रदर्शित होतोय.

Web Title: varun dhawan and alia bhatt lock for karan johars student of the year 3

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.