On the Valentine's day, the 'ha' was published by Sananan on marriage and love | व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी लग्न आणि प्रेमाबाबत क्रिती सॅनन केला 'हा' खुलासा

व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी क्रिती सॅनन लग्न आणि प्रेमाबाबत मोकळेपणाने बोलली आहे. क्रिती म्हणाली कि,'' तिला लग्नावर विश्वास आहे. ही एक सुंदर गोष्ट आहे. मात्र अरेंज मॅरेज करण्यामागील लॉजिक तिला कळत नाही. लग्नासाठी प्रेम करणं गरजेच आहे.''   
  
क्रिती पुढे म्हणाली, लग्ना करण्याआधी या व्यक्तीच्या प्रेमात पडणे गरजेच आहे. शेवट प्रश्न आयुष्याचा असतो. एक कुटुंबाचे असणे किंवा कुटुंब तयार करणे ही सुंदर गोष्ट असते. एकाच व्यक्तीसोबत आयुष्यभर राहणं हा एक सुंदर अनुभव आहे. गेल्या अनेक दिवसांपासून अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्याबरोबर तिचे अफेअर चर्चा आहे. सार्वजनिक ठिकाणी दोघांना अनेकवेळा एकत्र पाहण्यात आले आहेत. मात्र दोघांनी आपले नातं कधीच स्वीकारले आहे. क्रिती सॅनन लवकरच चित्रपट अर्जुन पटियाला मध्ये दिलजीत दोसांझ सोबत दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन दिनेश विजान करतायेत. चित्रपटाची शूटिंग चंडीगढला सुरु झाली आहे.  

अर्जुन पटियाला हा एक कॉमेडी चित्रपट आहे. ज्यात क्रिती एक पत्रकाराची भूमिका साकारणार आहे. दिलजीत यात एक छोट्या शहरामध्ये राहणाऱ्या मुलीची भूमिका साकारतो आहे. दोघे चित्रपटात रोमांस करताना दिसणार आहे. क्रिती आणि दिलजीत पहिल्यांदा एकत्र स्क्रिन शेअर करताना दिसणार आहेत. हा चित्रपट 13 सप्टेंबर 2018 ला प्रदर्शित होणार आहे.  

काही दिवसांपूर्वी क्रितीने ‘आॅडी क्यू7’ खरेदी केली आहे. या कारची किंमत 80 लाख इतकी असून, क्रिती एका चित्रपटासाठी 3.2 कोटी रूपये चार्ज करते. आतापर्यंत तिने बºयाचशा चित्रपटांमध्ये काम केले केले. परंतु यातील मोजकेच चित्रपट प्रेक्षकांवर प्रभाव टाकू शकले असले तरी, क्रितीच्या भूमिकेचे मात्र सर्वत्र कौतुक केले गेले. क्रितीने ‘हिरोपंती’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला. त्यानंतर तिने शाहरूख खान, वरुण धवन आणि काजोल यांच्याबरोबर ‘दिलवाले’ या चित्रपटात काम केले. पुढे २०१७ मध्ये ती ‘राब्ता’ आणि आयुष्यमान खुराणासोबत ‘बरेली की बर्फी’ या चित्रपटात झळकली. 
Web Title: On the Valentine's day, the 'ha' was published by Sananan on marriage and love
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.