Users of 'Mandirya Bedi' said in the picture, 'Kishvish is seen in Shaktimaan!' | मंदिरा बेदीच्या फोटोला यूजर्सनी म्हटले, ‘शक्तिमानमधील किलविश दिसत आहेस’!

मंदिरा बेदी सोशल मीडियावर जबरदस्त अ‍ॅक्टिव्ह असलेली अभिनेत्री आहे. ती नेहमीच तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर तिचे फोटोज् अपलोड करीत असते. नुकतेच मंदिराने तिच्या इन्स्टा अकाउंटवर एक फोटो अपलोड केला आहे. ज्यामध्ये तिने पांढºया रंगाचे चादर डोक्यावर ओढलेले दिसत आहे. फोटोमध्ये ती खूपच बोल्ड अवतारात दिसत आहे; मात्र यूजर्सनी तिच्या या बोल्ड अवताराला वेगळ्याच नजरेतून बघितल्याने, तिचे कौतुक करण्याऐवजी वेगवेगळ्या नावाने बारसे केले जात आहे. अर्थात यूजर्सच्या या कॉमेण्ट्स मजेशीर आहेत. 

एका यूजर्सने कॉमेण्टमध्ये लिहिले की, ‘शक्तिमानमधील किलविशसारखी दिसत आहेस’ मंदिरासाठी ही कॉमेण्ट म्हणजे हास्यास्पद असून, तीदेखील यूजर्सच्या अशा कॉमेण्ट्स एन्जॉय करताना दिसत आहे. मंदिरा तिच्या फिटनेसप्रती खूपच सजग आहे. जेव्हा ती आई झाली होती, तेव्हा तिचे वजन खूप वाढले होते. अशात तिने प्रचंड मेहनत घेऊन वजन कमी केले. सध्या ती खूप फिट दिसत असून, तिच्यातील हा बदल चाहत्यांना खूपच भावत आहे. 
 

सध्या मंदिराचे वय ४५ वर्ष इतके आहे, परंतु अशातही ती खूप फिट आहे. टीव्ही मालिका ‘शांति’मधून ओळख निर्माण करणारी मंदिरा बेदी ही तिच्या वास्तविक वयापेक्षा खूपच कमी वयाची वाटते. तिची फिट फिगर बघून कित्येक महिला तिला फॉलो करतात. मंदिराने दिग्दर्शक आणि निर्माता राज कौशल याच्याशी लग्न केले आहे. मंदिराने १९९५ मध्ये आलेल्या ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ या चित्रपटातही काम केले आहे. 

प्रेगनन्सी दरम्यान मंदिराचे वजन २२ किलोने वाढले होते; मात्र तिने केवळ तिचे वजनच कमी केले नाही, तर परत तिने तो शेपही मिळविला जो पडद्यावर दिसत होता. मंदिराचा फिटनेस मंत्रा म्हणजे ‘योग्य आहार’ हा होय. ती म्हणते की, योग्य वेळी आहार घेणे हाच फिटनेसचा मंत्र आहे. मंदिरा अधिक तेलकट आहार अजिबातच घेत नाही. दूध आणि फ्रूट्स हाच तिचा आहार आहे. जेवणातही ती योग्य प्रमाणात प्रोटिन घेत असते. दररोज ती २० मिनिटे एक्सरसाइजला देत असते. 
Web Title: Users of 'Mandirya Bedi' said in the picture, 'Kishvish is seen in Shaktimaan!'
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.