आयुषमान खुराना व भूमी पेडणेकर तिसऱ्यांदा घेऊन येताहेत अनोखी कथा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2019 08:00 PM2019-05-02T20:00:00+5:302019-05-02T20:00:00+5:30

'दम लगा के हईशा', 'शुभ मंगल सावधान' यांसारख्या सुपरहिट चित्रपटानंतर आयुषमान खुराना व भूमी पेडणेकर तिसऱ्यांदा एकत्र रुपेरी पडद्यावर दिसणार आहेत.

A unique story that brings Ayushman Khurana and Bhumi Pednekar for the third time | आयुषमान खुराना व भूमी पेडणेकर तिसऱ्यांदा घेऊन येताहेत अनोखी कथा

आयुषमान खुराना व भूमी पेडणेकर तिसऱ्यांदा घेऊन येताहेत अनोखी कथा

googlenewsNext

'दम लगा के हईशा', 'शुभ मंगल सावधान' यांसारख्या सुपरहिट चित्रपटानंतर आयुषमान खुराना व भूमी पेडणेकर तिसऱ्यांदा एकत्र रुपेरी पडद्यावर दिसणार आहेत. ते दोघे स्त्री चित्रपटाचा दिग्दर्शक अमर कौशिकचा आगामी चित्रपट 'बाला'मध्ये दिसणार आहेत. हे दोघे खूप चांगले मित्र असून ते या चित्रपटाच्या प्रवासा सुरूवात करण्यासाठी खूप उत्सुक आहेत. 

याबाबत आयुषमान म्हणाला की, 'आमच्या दोघांचे विचार एकमेकांशी खूप जुळतात. त्यामुळे आमचे चांगले जमते. मला आनंद आहे की भूमी व माझ्या चित्रपटाला प्रेक्षकांनी खूप पसंती दिली. आता सुपरहिट चित्रपट दिल्यानंतर पुढील प्रोजेक्टची जबाबदारी आणखीन वाढते. मला आशा आहे की या चित्रपटाची स्क्रीप्ट जगभरातील लोकांना आवडेल. भूमी टॅॅलेंटेड अभिनेत्री असून तिच्यासोबत काम करायला मजा येते. आम्ही आधीच लोकांना पाहण्यासाठी नवीन व अनोख्या गोष्टी दिल्या आहेत. आपल्या कथानकामुळे बाला चित्रपट देखील रसिकांना आवडेल आणि प्रेक्षक आमच्या तिसऱ्या सिनेमाला देखील खूप प्रेम देतील अशी आशा आहे.'


तर याबाबत भूमी म्हणाली की, 'आयुषमान व मला अशाप्रकारचे चित्रपट खूप आवडतात. कारण असे सिनेमे खऱ्या जीवनातील एक भाग असतात. आम्ही दोघए तिसऱ्यांदा एकत्र काम करत असून त्याबाबत खूप उत्सुक आहोत. आमच्या आधीच्या दोन्ही चित्रपटांना प्रेक्षकांनी खूप पसंती दिली होती. त्यातून आमचा आत्मविश्वास दुणावला. प्रेक्षकांना आमची जोडी हटक्या व अनोख्या चित्रपटात काम करावे अशी अपेक्षा आहे. 'बाला' चित्रपट प्रेक्षकांची अपेक्षा पूर्ण करण्यासाठी योग्य संधी आहे. हा चित्रपट पुन्हा एकदा सामाजिक परंपरांसोबत रसिकांना खळखळून हसवेल.आयुषमान एक चांगला अभिनेता आहे आणि नेहमीच मी चांगला अभिनय करण्यासाठी मला लाचार करतो. त्यामुळे या चित्रपटाच्या कामाला सुरुवात करण्यासाठी आता मी वाट पाहू शकत नाही.


सू्त्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार 'बाला' चित्रपटाचे शूटिंग मेच्या पहिल्या आठड्यात सुरू होणार आहे.'

Web Title: A unique story that brings Ayushman Khurana and Bhumi Pednekar for the third time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.