A unique record for 'Padmavati', behind 'Bahubali 2' and 'Dangal'. | ‘बाहुबली2’ व ‘दंगल’ला मागे टाकत ‘पद्मावती’ रचणार एक अनोखा विक्रम!!

संजय लीला भन्साळींचा ‘पद्मावती’ सध्या जाम चर्चेत आहे. रोज नव्या वादांनी या चित्रपटाचा पिच्छा पुरवला असतानाच आता या चित्रपटाने एक अनोखा विक्रम स्थापित करण्याची तयारी चालवली आहे. विशेष म्हणजे,  हा विक्रम स्थापित करताना ‘बाहुबली2’ आणि ‘दंगल’ या ब्लॉकबस्टर चित्रपटांना ‘पद्मावती’  पछाडणार आहे. होय, ‘बाहुबली’ आणि ‘दंगल’ या ब्लॉकबस्टर चित्रपटांना मागे टाकत ‘पद्मावती’ एकूण १५० देशांत रिलीज करण्याची योजना आहे.
१८० कोटी रुपए खर्चून बनलेला हा चित्रपट येत्या १ डिसेंबरला रिलीज होणार आहे. भारतात हा चित्रपट एकूण ४५०० स्क्रीन्सवर रिलीज केला जाणार आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर याच्या वितरणाची जबाबदारी हॉलिवूडच्या नावाजलेल्या ‘पॅरामाऊंट पिक्चर्स’ या स्टुडिओला देण्यात आली आहे. चर्चा खरी मानाल तर मेकर्सने ‘पद्मावती’ तब्बल १५० देशांत रिलीज करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय प्रत्यक्षात अमलात आल्यास हा एक मोठा विक्रम असेल. असे झालेच तर ‘पद्मावती’ हा ‘बाहुबली2’ आणि ‘दंगल’पेक्षाही यशस्वी ठरेल, यात शंका नाही. अमेरिका, ब्रिटन, सिंगापूर, मलेशिया या काही देशांत हा चित्रपट रिलीज होणे पक्के आहे. सोबतच चीनमध्येही हा चित्रपट रिलीज करण्याचे प्लानिंग सुरु आहे.
तूर्तास रिलीजबद्दल बोलायचे तर काही राजकीय पक्षांनी या चित्रपटाच्या रिलीजला विरोध केला आहे. गुजरात विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर  गुजरात भाजपाने या चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्याचे किंवा चित्रपटावर सरसकट बंदी लादण्याचे दोन पर्याय पुढे केले आहेत.  काँग्रेसनेही चित्रपटात ऐतिहासिक तथ्यांसोबत छेडछाड झाली असेल तर हा चित्रपट खरोखरीत प्रदर्शित होऊ नये, अशी भूमिका घेतली आहे.

ALSO READ: भाजपाची ‘पद्मावती’वर बंदीची मागणी; जाणून घ्या काय आहे कारण!

काही राजपूत संघटनांनी आधीच या चित्रपटाला विरोध चालवला आहे. अगदी अलीकडे  जय राजपुताना संघ या राजपूत गटाने ‘पद्मावती’च्या मेकर्सला जाहिर धमकी दिली होती. रिलीज आधी ‘पद्मावती’आम्हाला दाखवला गेला नाही आणि आमच्या संमतीविना तो रिलीज झालाच आणि त्यात काही आक्षेपार्ह आढळलेच तर चित्रपटगृहे पेटवून देऊ, असे जय राजपुताना संघाने म्हटले होते.त्याआधीशूटींगच्या अगदी पहिल्या टप्प्यात करणी सेनेने ‘पद्मावती’च्या सेटवर धिंगाणा घातला होता.
Web Title: A unique record for 'Padmavati', behind 'Bahubali 2' and 'Dangal'.
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.