Unfortunate coincidence! Like Aarjun, Jhanvi did not even have to see 'Debu'! | एक दुर्दैवी योगायोग! अर्जुनप्रमाणेच जान्हवीचा ‘डेब्यू’ पाहण्यासाठीही आई नाही!!

श्रीदेवी यांचे दुबईत हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यांच्या निधनाने अख्खी बॉलिवूड इंडस्ट्री धक्क्यात आहे. श्रीदेवी यांची मोठी मुलगी जान्हवी कपूर लवकरच बॉलिवूडमध्ये डेब्यू करतेय. येत्या जुलैमध्ये तिचा ‘धडक’ हा पहिला सिनेमा प्रदर्शित होतो आहे. श्रीदेवींनी या चित्रपटासाठी जान्हवीला खास तयार केले होते. तिच्या व्यक्तिमत्त्व विकासापासून डान्सिंग क्लासपर्यंत सगळ्यांवर श्रीदेवींची नजर असायची. श्रीदेवी आपल्या दोन्ही मुलींच्या खूप जवळ होती. जान्हवीला तर तिने स्वत:ला डोळ्यापुढे ठेवून घडवले होते. शूटींगला जाण्यापासून तिच्या करिअरबद्दलचे सर्व निर्णय श्रीदेवी स्वत: घ्यायच्या. श्रीदेवीला एक मोठी स्टार म्हणून पाहणे, त्यांचे स्वप्न होते. मुलीचा डेब्यू सिनेमा पाहण्यासाठी श्रीदेवी आतूर होत्या. पण त्यापूर्वीच श्रीदेवींना मृत्यूने गिळले.  तिच्या ग्रॅण्ड लॉन्चची जबाबदारी त्यांनी म्हणूनच करण जोहरवर टाकली होती. पण लेकीचे ह ग्रॅण्ड लॉन्चिंगही पाहणे श्रीदेवींच्या नशिबात नव्हते.  जान्हवीचा सावत्र भाऊ अर्जुन कपूर याचा डेब्यू पाहायला त्याची आई मोना कपूर (बोनी कपूर यांची पहिली पत्नी. श्रीदेवींशी लग्न करण्यासाठी बोनी कपूर यांनी मोना यांना घटस्फोट दिला होता.) नव्हत्या. अर्जुनचा ‘इशकजादे’ रिलीज होणार होता. त्यापूर्वी मोना यांनी अंतिम श्वास घेतला होता. हा दुर्दैवी योगायोग म्हणावा लागेल की, जान्हवीचा पहिला चित्रपट पाहण्यासाठी तिची आई सुद्धा या जगात नाही.
ALSO READ :श्रीदेवी बाथरूममध्ये पाय घसरून पडल्या आणि बेशुद्ध झाल्यात...!  
बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी यांचे शनिवारी रात्री दुबईत निधन झाले. भाचा मोहिम मारवाह याच्या लग्नासाठी श्रीदेवी दुबईला गेल्या होत्या. हा लग्न सोहळा आनंदात पारही पडला.  पण याचदरम्यान शनिवारची रात्र श्रीदेवींच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी घेऊन आली. प्राप्त माहितीनुसार, शनिवारी रात्री श्रीदेवी बाथरूममध्ये पाय घसरून पडल्या आणि पडताक्षणी  बेशुद्ध झाल्यात. त्यांना ताबडतोब रूग्णालयात हलवण्यात आले. रूग्णालयात पोहोचल्यावर त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता, हे स्पष्ट झाले. याच झटक्याने त्यांचे निधन झाले.
Web Title: Unfortunate coincidence! Like Aarjun, Jhanvi did not even have to see 'Debu'!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.