Uncovering! Such a Munni Rai is such a big movie !! | मोठ्ठा खुलासा! असा मिळाला मौनी रायला इतका मोठा सिनेमा!!

टीव्हीवरचा लोकप्रीय चेहरा असलेली मौनी राय लवकरच बॉलिवूड डेब्यू करते आहे. मौनी राय बॉलिवूड चित्रपटांत दिसणार, अशी चर्चा बºयाच दिवसांपासून होती. अखेर अक्षय कुमारचा ‘गोल्ड’ हा सिनेमा मौनीच्या हाती लागला अन् तिचे नशीब फळफळले. अर्थात यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. मौनीला इतका मोठा चित्रपट सहजासहजी मिळणारा नाही. यामागे नक्कीच कुणाची तरी वशिलेबाजी असावी, इतपर्यंत चर्चांना ऊत आला. मौनीला सलमान खानमुळे हा चित्रपट मिळाला, असेही बोलले गेले. तुम्हीही हाच विचार करत असाल तर ‘गोल्ड’चे निर्माते रितेश सिधवानी काय म्हणतात, हे तुम्ही बारकाईने ऐकायला हवे.
होय, कारण मौनीला ‘गोल्ड’ हा सिनेमा कुणाच्याही पुण्याईने मिळालेला नाही तर स्वत:तील प्रतिभेच्या जोरावर मिळालेला आहे. हे आम्ही नाही तर सिधवानी यांचे म्हणणे आहे. एका इव्हेंटमध्ये सिधवानी यांनी ही कबुली दिली आहे. ‘प्रामाणिकपणे सांगायचे तर, कुणीही मौनीची शिफारस वगैरे केलेले नाही. ती अतिशय टॅलेंटेड अभिनेत्री आहे. तिच्यातील प्रतिभेकडे दुर्लक्ष करून तिला हा चित्रपट केवळ शिफारसीच्या जोरावर मिळाला, असे म्हणणे गैर ठरेल. या चित्रपटासाठी मौनीने आॅडिशन दिले होते आणि या परिक्षेत ती पास झाली. आम्ही सर्वांनी म्हणजे फरहान आणि रीमा अशा सगळ्यांनी तिचे आॅडिशन पाहिले आणि तिची निवड केली. सगळ्यांसारखे तिने सुद्धा आॅडिशन दिले. यानंतरच तिला हा चित्रपट मिळाला,’ असे सिधवानी यांनी सांगितले.
‘गोल्ड’मध्ये मौनीच्या वाट्याला आलेली भूमिका अतिशय महत्त्वपूर्ण आहे. येत्या वर्षांत हा चित्रपट रिलीज होणार आहे. तूर्तास या चित्रपटाचे शूटींग सुरु आहे.
Web Title: Uncovering! Such a Munni Rai is such a big movie !!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.