Ultimately, the celebrated Shubhamangala of Vrusha, Satyajnma Bales built in Italy !! | अखेर विरूष्काचे शुभमंगल संपन्न, इटलीत बांधल्या साताजन्माच्या गाठी!!

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि त्याची प्रेयसी अभिनेत्री अनुष्का शर्मा यांचे अखेर शुभमंगल संपन्न झाले. गेल्या काही दिवसांपासून दोघांच्या लग्नावरून खरपूस चर्चा रंगली होती. लग्न करणार, नाही करणार अशा दोन्ही स्वरूपाच्या बातम्या समोर येत असल्याने त्यांच्या चाहत्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. अखेर हे दोघे विवाहबंधनात अडकल्याचे विराट आणि अनुष्काने आपल्या फॅन्सना सांगितले आहे. इटलीतल्या टस्कनी इथल्या बोर्गो फिनोखिएतो Borgo Finocchieto या रिसॉर्टमध्ये हा विवाहसोहळा पार पडला. दोघांच्या लग्नाचे रिसेप्शन दिल्लीत 21 तारखेला होणार असून अनुष्का आणि विराटच्या मित्र मैत्रिणीसाठी 26 तारखेला मुंबईत रिसेप्शन आयोजित करण्यात आले आहे. रिसेप्शन नंतर नवीन वर्षाच्या स्वागतासाठी ते साऊथ आफ्रिकेला रवाना होणार आहेत.दरम्यान, यापूर्वी हे दोघे ९ ते १२ डिसेंबरदरम्यान विवाहाच्या बंधनात अडकणार असल्याची चर्चा होती. परंतु अनुष्काच्या प्रवक्त्याकडून ही चर्चा निराधार असल्याचे म्हटले होते. त्यानंतर अनुष्का परिवारासह इटलीला रवाना झाल्याचे वृत्त समोर आल्यानंतर दोघांच्या लग्नाची पुन्हा एकदा चर्चा रंगली होती. विशेष म्हणजे जेव्हा अनुष्का परिवारासह इटलीला जात होती, तेव्हा कौटुंबिक पंडितही त्यांच्यासोबत रवाना झाले होते. त्यामुळे या दोघांची लगीनघाई सुरू असल्याचे जवळपास स्पष्ट झाले होते. त्याचबरोबर लग्नात सहभागी होणाºया गेस्टची लिस्टही समोर आली होती. तसेच अनुष्काच्या घराबाहेर केलेली रोषणाईदेखील त्यांच्या विवाहसोहळ्याची नांदी देत होती. दरम्यान, आता या दोघांच्या लग्नाची अधिकृत घोषणा समोर येण्याची त्यांच्या चाहत्यांना प्रतीक्षा आहे. सूत्रानुसार या विवाहसोहळ्यात माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, युवराज सिंग उपस्थित होते. याव्यतिरिक्त विराटने त्याचे लहानपणीचे कोच राजकुमार शर्मा यांनाही निमंत्रित केले होते. त्याचबरोबर अनुष्काने अभिनेता आमिर खान, शाहरूख खान, दिग्दर्शक आदित्य चोपडा, रणबीर कपूर, करण जोहर, कॅटरिना कैफ आणि प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा यांनाही निमंत्रण दिले होते. विराट आणि अनुष्का गेल्या पाच वर्षांपासून एकमेकांना डेट करीत आहेत. पहिल्यांदा जेव्हा ते एका जाहिरातीदरम्यान एकत्र आले होते, तेव्हाच त्यांच्यात प्रेमांकुर फुलले होते. पुढे २०१५ मध्ये या दोघांचे ब्रेकअप झाल्याची अफवा पसरली होती. त्यानंतर ‘सुलतान’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानही त्यांच्यात सर्व काही आलबेल नसल्याची चर्चा रंगली होती. 
Web Title: Ultimately, the celebrated Shubhamangala of Vrusha, Satyajnma Bales built in Italy !!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.